ईतर

पुसद शहराच्या हद्दीत अवैधरित्या तिनशे ब्रास रेती साठा जप्त; महसूल व पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभार उघड!

पुसद: शहरा लगत श्रीरामपूर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सहारा पार्कमधील डोंगरे ले-आऊटमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या काळ्या रेतीचा साठा आढळून आल्याने महसूल व पोलिस प्रशासनाच्या कारभार प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद शहरातील वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरातील सहारा पार्कमधील डोंगरे ले-आऊटमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध साठवणूक केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांना मिळाली. त्यावरून उपविभागीय अधिकार्‍यांनी नायब तहसीलदार वैभव खाडे, मंडळ अधिकारी मयूर मस्के, तलाठी कामराज चौधरी व निरंजन वानखेडे या महसूल व पोलिस यंत्रणेने संयुक्त कारवाई करून अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेला काळ्या रेतीचा साठा जप्त केला. अंदाजे ३०० ब्रास इतका रेतीसाठा आढळून आला आहे. मात्र, साठा जप्त करण्यात आलेल्या अब्दुल राजीक अब्दुल रौफ यांनी साठा केवळ ८० ते ९० ब्रास असल्याचा दावा करत, तो घरबांधणीसाठी आणलेला असल्याचे स्पष्टीकरण माध्यमांशी बोलताना केले आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीसाठा शहरात साठवलेला असताना संबंधित महसूल व पोलीस प्रशासनाच्या नजरेतून तो कसा सुटला, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात एवढा मोठा रेतीचा साठा तेही अवैधरित्या जमा केला जात तर संबंधित प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कां? करीत आहेत ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे.रेती तस्कर या तस्करीतुन शासनाला कोट्यवधीचा चूना लावतात तरीही संबंधित पोलीस व महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे या तस्करांचे अत्यंत ‘गोड’ संबंध आहेत. ‘मिठाई’च्या बॉक्समधून महिन्याकाठी हे ‘अर्थ पूर्ण संबंध जोपासत हे कर्मचारी वरकमाई करतात. महसूल प्रशासनाच्या कार्यालयातील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनीचे ‘सीडीआर’ तपासल्यास मोठे घबाड उघडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकरण आता उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या पातळीवर गेले असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या काळ्या रेतीच्या साठ्याची अचूक मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर साठा वैध की अवैध याबाबत अंतिम निष्कर्ष काढून संबंधित रेती तस्करावर गौण खनिज कायदा अन्वये चारपट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.पंरतु सध्या याबाबत स्पष्टता अद्याप नाही. तसेच, स्थानिक पातळीवर कोणाचा पाठिंबा होता याचाही तपास होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. पुसद शहरात वाढत चाललेल्या अवैध रेतीची तस्करी व साठवणुकीमुळे हे रेती तस्कर कोट्यावधी अवैधरित्या माया जमवित आहेत आणि शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवित आहेत त्यामुळे अशा रेती तस्करावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार तहसील रेखा वाणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून योगेश गाडे नायब तहसीलदार ,मयूर मस्के,मंडळ अधिकारी ,गोपीनाथ इंगोले, राहुल खाडे, निरंजन वानखेडे हे सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close