पुसद: नुकत्याच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत हजरत उमर फारूक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. जुहा फातेमा मिर्झा साजिद बेग हीने ९४% गुण प्राप्त करत विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे तिला विषयनिहाय गुण इंग्रजी ९५ हिंदी मराठी ९५ गणित ९२ उर्दू ९६ सामाजिक शास्त्र ९२ असे गुण प्राप्त केले आहे.तिच्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक शिक्षक व आई वडीलांना दिले आहे.