बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी निवडणूक!सत्ताधाऱ्यांनी सत्तेसाठी सूतगिरणी उभी करणाऱ्या३९०३ सभासदांना मतदानापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले-पंजाबराव देशमुख खडकेकर

पुसद: येत्या १७ जून रोजी बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी मर्यादित पिंपळगाव (कांन्हा) येथील निवडणूक होत असून गेल्या ३० वर्षात ज्यांच्या नेतृत्वात या सहकारी संस्थेचा बट्ट्याबोळ झाला त्याच मनोहरराव नाईक यांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा सूतगिरणीवर सत्ता प्राप्त करण्यासाठी तब्बल ३९०३ सभासदांचा मतदानाचा हक्क विविध कारणे दाखवित हिरावला असून या निवडणुकीत एकुण ७७९९पैकी केवळ ३००६सभासदांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी ची निवडणूक येत्या ७जून रोजी होत असून यासाठी २१ संचालकांची नेमणूक करावयाची आहे त्यापैकी अनेक जागांवर मनोहरराव नाईक यांच्या गटाने अविरोध बाजी मारली असून ओबीसी एका जागेसाठी व कापूस उत्पादक गटातील ११ जागांसाठी निवडणूक थाटली आहे. कापूस उत्पादक गटात एकूण सोळा उमेदवार रिंगणात असून त्यापैकी अकरा उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत.ज्या सभासदांनी ही सुतगिरणी उभी करण्यासाठी त्याकाळी हजारों रुपयांचे कर्ज काढून शेअर्स घेतले त्याच संस्थापक सदस्यांना विविध कारणांवरून स्वताच्या स्वार्थासाठी काढून टाकले.तांञीक कारणांवरून सुमारे ३९०३ सभासदांचा मतदानाचा हक्क हिरावला असा विश्वासघात करणे योग्य आहे का?असा सवाल करीत या सभासदांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आपण न्यायालयात जावू असे मत पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी दि.१३जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.या पञकार परीषदेत पंजाबराव देशमुख खडकेकर, डॉ.मोहम्मद नदीम,दिलीप बेद्रे पाटील,अनिल शिंदे, विलास गावंडे,जयंत चौधरी आदी उपस्थित होते.पञकार परीषदेत माहिती देताना डॉ मोहम्मद नदीम यांनी सांगितले की,सन १९९०ला सुमारे २०कोटी रुपयांची मशीनरी खरेदी केली ती २५वर्षातच बदलून स्वताच्या स्वार्थासाठी पून्हा करोडो रुपये कर्ज काढून दूसरी मशीनरी बसविण्यात आली.सद्यस्थितीत या सुतगिरणीवर आधुनिकीकरणाच्या नावाखाली सुमारे ४२कोटी रूपयांचा बोजा असून आधीच १२कोटी रुपये तोट्यात आणलेली ही संस्था पांच वर्षांपासून दरवर्षी सुमारे चार कोटी रुपये व्याज भरते. डॉ नदीम यांनी पुढे सांगितले की,१२.५०कोटीच्या ठेवी पुसद अर्बन बँकेत असतांनाच त्या तकलादू कारण सांगून मलकापूर अर्बन बँकेत ठेवल्या ,ती बंकच अवसायनात निघाली.यामुळे सुत गिरणी चे करोडो रुपयांचे नुकसान झाले. स्वीट विक्रीच्या व्यवहारातील दर तफावतीचेही मोठे गौड बंगाल असून सन २०२२ साली संचालक मंडळावर ४१ लाख रुपयांची रिकवरी फिक्स केली होती ती अद्याप पर्यंत वसूल करण्यात आलेली नाही.ही गीरणी टिकवायची आहे यासाठी आम्ही कोणालाही अंदाधुंदी करू देणार नाही असेही उपस्थित सदस्यांनी पञकार परीषदेत सांगितले.



