क्राइम

पुसद बस स्थानकाचा परीसर बनतोय “सुसाइड स्पॉट”; एका अनोळखी ४५ वर्षीय व्यक्तीने नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन केली आत्महत्या!

पुसद शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना..

पुसद : शहरातील बस स्थानक परिसरात आज पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या बस स्थानक परिसरातील धर्मात पाणपोईच्या बाजूला असलेल्या जाहिरात फलकाच्या लोखंडी अँगलला एका अनोळखी ४५ वर्षीय व्यक्तीने नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. या घटनेमुळे हा बस स्थानक परिसर आता ”सुसाइड स्पॉट” बनत चालला आहे की काय, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.सदर व्याक्ती बाबत पोलिसांनी तपास केला तेव्हा त्याच्याजवळ पुसद शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची चिट्ठी मिळून आली असता तो कुठला आहे त्याचा सुगावा लागला असून त्याची ओळख पटली आहे.

सचिन प्रकाश करपे वय ४५ वर्षे रा. दत्तनगर आर्णी जि. यवतमाळ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.सदर व्यक्तीने आत्महत्या कां.? केली हे मात्र गुलदस्त्यात आहे.याबाबत सूत्राने ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की,पुसद शहरातील बस स्थानक परिसरातील धर्मार्थ पाणपोईच्या बाजूला असलेल्या जाहिरात फलकाच्या मागच्या लोखंडी ॲंगलला एका अनोळखी व्यक्तीने नायलॉनच्या दोरीच्या साह्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली आहे.त्यामुळे बस स्थानक परिसरात खळबळ उडाली होती व बघ्याची एकच गर्दी झाली होती.त्यावेळी सदर घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला त्यावेळी सदर मय्यत व्यक्तीच्या खिशामध्ये पुसद शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची डॉक्टरांची चीठ्ठी मिळून आली होती सदर व्यक्ती हा दि,१८ मे २०२६ रोजी उपचार घेण्यासाठी पुसद येथे आला असल्याचे निदर्शनास आले त्यावरून आत्महत्या झालेल्या व्यक्तीची ओळख पटली व पोलिसांनी हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला सदर घटनेचा अधिकचा तपास पुसद शहर पोलीस स्टेशन पोलीस नीरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अक्षय सनगर हेड कॉन्स्टेबल अतुल दातीर हे करीत आहेत मात्र पुसद बस स्थानक परिसरातील अशा घटनेकडे संबंधित प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे या बसस्थानकावर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते येथे प्रवाशी तासन्तास थांबलेले असतात, तर काही रीकामटेकडेही जणू काही हा एखादा ”पिकनिक स्पॉट” असल्यासारखे फीरत असतात अशा गर्दीमुळे येथे ये-जा करणाऱ्यावर कोणाचेही अंकुश नाही तसेच ज्या पोलिसांच्या ड्युट्या असतात ते पोलीसुध्दा आपले कर्तव्य बजावताना दिसत नाहीत किंवा पोलिसांची गस्त सुध्दा नियमित आसने गरजेचे आहे तसेच संबंधित महामंडळाच्या व्सुयवस्थापकाचे सुद्धा या परीसरात लक्ष राहत नाही त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहेत वारंवार घडणाऱ्या या घटनांना रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने आता तरी जागे व्हावे. या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा अजून किती निष्पापांचे बळी जाणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.या घटनेमुळे हा बस स्थानक परिसर आता ”सुसाइड स्पॉट” बनत चालला आहे की काय, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close