ईतर

माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या वतीने मदत केंद्र पुसद येथे गोल्ड मेडललिस्ट साक्षी बुरकुलेचा सत्कार!

पुसद: शहराच्या इतिहासात गोल्ड मेडल मिळवून मानाचे स्थान मिळविणारी साक्षी सर्वसामान्य परिस्थिती असताना सुद्धा जिद्दीने व मेहनतीने तिन्हे यश मिळविले केंद्र सरकारतर्फे आयोजित रायपूर (छत्तीसगड) येथे पार पडलेल्या पहिल्या ट्रायबल खेलो इंडिया स्पर्धेत ८२ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकवणारी विदयार्थीनी कु.साक्षी बंडू बुरकुले हिचा माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद ,मिशन ग्रीन,वसुंधरा बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून सन्मानचिन्ह व वृक्ष रोपटे देऊन सत्कार करण्यात आला .तसेच उपस्थित मान्यवर शरद पाटील व अनिकेत पाटील यांच्या हस्ते खेलो इंडिया २०२५ मध्ये कास्य पदक प्राप्त कु. पूजा संजय ढेपेकर व राज्यस्तरीय रोप्य पदक प्राप्त पियुष आढावे यांचा सुद्धा सन्मानचिन्ह व वृक्ष रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

साक्षी बुरकुले हिचा अभिमान पुसदवासीयांना आहे.तिने पुसद शहराचे नाव रोशन केले तिच्या या विजयाचे पुसद शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळेस शरद शेषराव पाटील,राजेश्वर पाटील,अनिल पाटील,अनिकेत पाटील,श्याम पाटील माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव, मिशन ग्रीन चे अध्यक्ष रमेश डबोळे, मंगेश भगत,संतोष गावंडे मधुकर चव्हाण,दिगंबर देशमुख,सोनू पाटील,अरुण नागुलकर ,धनंजय आघाम,मुरलीधर ढगे,प्रमोद ठाकूर,दादाराव पाईकराव,दीपक घाडगे,आदित्य जाधव,अमित हटवार,नितीन चव्हाण व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close