राजकिय

पुसद येथे काँग्रेसची भव्य तिरंगा रॅली भारतीय सैनिकांच्या शौर्याला अभिवादन!

डॉ. मोहम्मद नदीम प्रदेश काँग्रेस सचिव यांच्या नेतृत्वात

पुसद:शहरात काँग्रेसच्या वतीने डॉ. मोहम्मद नदीम प्रदेश काँग्रेस सचिव यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅलीचे दि,२१ मे २०२५ रोजी आयोजन करण्यात आले. या रॅलीचा उद्देश भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला आणि त्याच्या कर्तृत्वाला अभिवादन करणे हा होता.’फौज के सम्मान मे हम निकले मैदान’ में च्या जयघोशात तिरंगा रैलीची सुरवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नेताजी सुभाषचंद्र बोस, कापड लाईन ते महात्मा गांधी चौक ते भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रैलीच समारोपन करण्यात आले.

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रैली चे आयोजन काँग्रेसने केली होती परंतु या रॅलीमध्ये सर्व सामाजिक राजकीय व धार्मिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता, यावेळी माजी सैनिक व मुस्लिम समाजातील मदरसा मधील शिक्षण घेणारे लाहांन विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याला “पहलगाम हल्ला” या ऑपरेशनद्वारे बदला घेतलाआहे. या कारवाईत पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी नष्ट झाले असून भारतीय सैन्य दलाने आपल्या शौर्याची जी साक्ष दिली, भारतीय सैनिकांच्या पराक्रमा पुढे पाकिस्तानने गुडघे टेकले. निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांचा सूड सैनिकांनी घेतला. त्यामुळे संपूर्ण देशभरात समाधानाचे वातावरण आहे. भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रप्रेमी पुसदकरांनी उत्स्फूर्तपणे तिरंगा यात्रेत सहभाग घेतला. त्याबद्दल नागरिकांनी कौतुक व्यक्त केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवताना पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करण्यात आला. यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. यानंतर पाकिस्तानने केलेल्या कुरापतीला चोख प्रत्युत्तर भारताने दिले. दहशतवादी हल्ल्याचा बदला मोठ्या पराक्रमाने घेतला आहे,पाकिस्तानला जशास तसे ठोउ उत्तर देऊन धडा शिकविला,त्या बद्दल भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी,विंग कमाडर योमिका सिंग व त्यांचे सहकारी यांचा देशभरात कौतुक करून तिरंगा रॅली च्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे, व एकीकडे काही कंटक मानसिकतेचे लोकं आपल्या देशाच्या सैनिकांच्या भावना दुखावून त्यांचा अपमान करीतअसले तरीही देशभरातील जनता भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ उभी आहे हे विशेष, पुसद येथे सर्व राजकीय धार्मिक व सामाजिक संघटनेच्या वतीने पुसद येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, सदर रॅलीमध्ये डॉ मोहम्मद नदीम सचिव प्रदेश काँग्रेस,जमीयते उल्लेमाचे मौलाना युनूस बुखारी माजी सैनिक संघटना पुसदसय्यद इस्ती्यक सचिव प्रदेश अल्प.झिया शेख शहराध्यक्ष पुसद काँग्रेस किशोर कांबळे जिल्हाध्यक्ष भीमटायगर सेना,अनिल शिंदे उपाध्यक्ष जिला काँग्रेस,तहेसीन खान अध्यक्ष रा. मुस्लिम परिषद अमजद खान अध्यक्ष AIMIM,गणपतराव गव्हाळे जिल्हाध्यक्ष आदिवासी ऐकता परिषद,नरेंद्र खंदारे माजी सभापती ऍड. गजानन देशमुख जिल्हा सचिव काँग्रेस,अमजद खान जिला उपध्यक्ष अल्प. रा. का.मिर्झा आदिल बेग अध्यक्ष मौलाना आझाद विचारमंच लियाकत पठाण सामाजिक कार्यकर्ताजाहीर खान माजी नगरसेवक,
विलास वाघमारे ता. अध्यक्ष काँग्रेस अकील सर पुसद क्रीडा रत्न भांडणगे सरपंच, रियाज मौलाना रहेमान गौरी, अफरोज गुलशन सय्यद अन्वर माजी नगरसेवक अब्दुल समद माजी नगरसेवक नन्हे खान शहराध्यक्ष अल्प. राका जब्बार लाखे अल्प. शहराध्यक्ष लक्षण कांबळे पत्रकार डॉ. मोहसीन,रहेमान भाई जलील बागवान सदस्य ग्रा. प.सय्यद जानी, वाजीद खानसलमान पप्पू, बाबा मिर्झा सोहेल निरबान, सोहेल चव्हाण माहेमूद शेख माजी सभापती माजिद लाला , आरिफ गुड्डू, डी. जे. जिंदरान विक्की गौरी, फरहान मलंग सरदार खान, माहेफुज अहेमद साहील खान, अमन टेलर युनूस शेख माजी नगरसेवक राजू कांबळे, तौफिक टेलर एकबाल ठेकेदार हे प्रमुख उपास्थितीत होते.देशभक्ती गीत व दिल दिया है जान भी देंगे या जय घोषाने परिसर दुमदुमला होता आयोजित रैली चे यशस्वीते करिता मुस्लिम युवक मंडळ पुसद यांनी अथक परिश्रम घेतला या रॅलीमध्ये मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close