क्राइम

सोयाबीनच्या गंजीला आग; एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान

पुसद :ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वनवारला शेत शिवारामध्ये शेतात सोयाबीनची गंजी मारून ठेवली असताना त्या सोयाबीनचे गंजीला आग लावून जाळून टाकल्याची घटना दि.७ ऑक्टोबर २०२४ रोजी च्या रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या आगीमध्ये शेतकऱ्याचे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले असून अनुसया देविदास पवार वय ४८ वर्ष रा. मरसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गावातील रहिवाशी असलेल्या प्रल्हाद जाणुसिंग पवार वय४५ वर्ष व त्याच्या तीन साथीदाराविरोधात सोयाबीनची गंजी जाळणल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वनवाराला शेत शिवारात दि.७ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास प्रल्हाद व त्याच्या तीन साथीदाराने संगणमत करून फिर्यादी अनुसया यांच्या शेतात सोयाबीनची अंदाजे जवळपास३०क्विंटल ची  गंजी मारून ठेवलेली होती त्याची किंमत अंदाजे १ लाख २०हजार रुपये असुन हे सोयाबीन संपूर्ण जळून खाक झाले असल्याने शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. या आगप्रकरणी फिर्यादी अनुसयाचा संशय प्रल्हाद व त्याच्या तीन साथीदारावर असून या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close