शैक्षणिक

शिक्षकांनी लोकसहभागातून साधला शाळेचा विकास ! 

पुसद : शासन लोकसहभागातून अनेक योजना राबविते परंतु लोकसहभागातून विकास कामे करणे या काळात फार अवघड झालेले असतांना पुसद पंचायत समितीतील एका छोट्याशा तांड्यातील शिक्षकांनी लोकसहभागातून तब्बल पंच्याहत्तर हजार रुपये जमवून शाळेचे रुपडेच पालटले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवीतांडा येथील शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव राठोड व त्यांचे सहकारी परमेश्वर कबले यांना शाळेत आवश्यक त्या भौतिक सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवला व त्यांनी सुरुवातीलाच पालक सभेमध्ये “लोकसहभागातून, समृद्धीकडे “हा उपक्रम शाळेत राबविण्याचा संकल्प केला व सर्वप्रथम स्वतः त्यांनी एक एक भौतिक सुविधेची कामे करण्यास सुरुवात केली. श्री.राठोड यांनी स्वतः एकवीस हजार रुपये खर्च करुन अनेक महत्त्वाची कामे केली. व हळूहळू ही कामे दिसू लागताच, अनेक दाते तयार होऊ लागले. त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करण राठोड यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौजन्य म्हणून शाळेचे प्रवेशद्वाराला येणारा अकरा रुपये खर्च करून त्यात भर टाकली. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल आडे यांनी हीच प्रेरणा घेऊन, आपल्या वडिलांच्या नावे त्यांनी शाळेत महानायक वसंतराव नाईक कलामंच साठी लागणारे एकवीस हजार रुपयांचा खर्च त्यांनी उचलला व कला मंच तयार केला. हाच धागा पकडून शाळेचे सहाय्यक शिक्षक परमेश्वर कबले यांनी सुद्धा तयारी दर्शवून पाच हजार अशी मदत शाळेकरिता केली .यातूनच समोर पालकांना प्रेरणा मिळून त्यांनी सुद्धा आपल्या पद्धतीने जेवढे होईल तेवढी देणगी दिली. पालक उमेश जाधव हे गवंडी काम करतात त्यांनी शाळेला दोन दिवस विनामूल्य सेवा देऊन बांधकाम करून दिले. तसेच जमा झालेल्या लोकसभागाच्या निधीतून शाळेच्या मुख्याध्यापकांनी आवश्यक असलेले तिन्ही रूमचे नूतनीकरण, सुशोभीकरण, तसेच कॅरियर, शाळेच्या सभोवती असणाऱ्या झाडांना रंगरंगोटी, बाथरूमला दोन्ही साईड ने गेट ,प्रवेशद्वार, महानायक कला मंच. इत्यादी कामे त्यांनी लोकवर्गणीतून केल्यामुळे एक नवा आदर्श सर्वा पुढे त्यांनी ठेवला आहे. लोक वर्गणीतून झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करण राठोड , उद्घाटक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी अमित बोजेवार हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी सुनील गवळी ,केंद्राच्या केंद्रप्रमुख संगीता निस्ताने,केंद्रप्रमुख प्रकाश टेकाळे , विठ्ठल आडे , गजानन राठोड, जालिंदर राठोड पवन खिल्लारे, चिंतामण झोडगे,गोकुळ जाधव,विजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. बोजेवार यांनी लोकसभागातून समृद्धीकडे हा महामंत्र असून आपल्या सहभागातून ही विकास कामे इतरांना प्रेरणादायी ठरेल असे उद्गार काढून गावकर्‍यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना सहकार्य केल्याबद्दल सर्व पालक व नागरिकांचे अभिनंदन करुन मुख्याध्यापकांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक श्री.कबले यांनी केले. या कार्यक्रमाला श्री खंदारे श्री.बाबुराव जाधव, श्री शंकर जाधव, गणेश जाधव, उमेश जाधव ,नारायण राठोड ,अंबादास पवार, राहुल राठोड, शिवाजी राठोड, कोमल राठोड, धुरपता जाधव, श्रीमती झामीबाई राठोड,संतोष आडे ,दुर्गादास राठोड उपस्थित होते. यशस्वी ते करिता शाळा स्थापन समिती सदस्य , पालक, युवक वर्ग यांनी पुढाकार घेतला लोकसभागातून झालेल्या विकास कामामुळे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकसहभागातून केलेल्या कामाची पाहणी केली असता शाळेला सुशोभित करेल असे कामे करण्यात आलेली आहे. मी गावकर्‍यांच्या दातृत्वाला सलाम करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व जि.प.च्या प्रत्येक शाळेने अशाप्रकारचे उपक्रम राबवून शाळा सुसज्ज करण्याचे आवाहन करतो.

 –धीरज आडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, पुसद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close