पुसद न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न!

पुसद:मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये दि.३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालत व्ही. बी. कुळकर्णी, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्हा न्यायाधीश- १, पुसद यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सदर राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पैनल क्र. १ वर पैनल न्यायाधीश म्हणून व्हि. बि. कुळकर्णी साहेब, जिल्हा न्यायाधीश-१, पुसद, पैनल क्र.२ वर एन. बी. जाधव साहेब, २रे सहदिवाणी न्यायाधिश व. स्तर, पुसद पैनल क्र.३ वर एन. जी. व्यास साहेब, सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर पुसद, पैनल क्र.४ वर व्ही. एस. वाघमोडे साहेब, ३रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, पुसद, पॅनल क्र.५ वर व्ही. बी. चव्हाण साहेब, ६वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर पुसद, पॅनल क्र.६ वर झेड. झेड. कादरी साहेब, ७वे सहदिवाणी न्यायाधिश क.स्तर, पुसद हे पैनल न्यायाधीश म्हणून हजर होते. तसेच जिल्हा न्यायालय-१, पुसद येथील अधिक्षक श्रीमती. एम. आर. काळबांडे आणि विधीज्ञ ॲड. आर. डी. रुडे, ॲड. अंबिका जाधव, ॲड. अमोल भालेराव ॲड. संतोष मुळे, अड. दिनेश राठोड, ॲड. इमरान चव्हाण व इतर विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी हजर होते.सदर लोकअदालतमध्ये वादपूर्व प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात दावे, चेक बाऊन्स (१३८ एन.आय. अॅक्ट) प्रकरणे, वाहन कायदा संदर्भाचे प्रलंबित असलेले व इतर प्रकरणे मिळून एकूण ठेवण्यात आलेले ६,०३५ असून त्यापैकी एकूण २५९ प्रकरणे समझोताद्वारे निकाली काढण्यात आलेले असून अशी एकूण रक्कम ४,५२,९५,५३७/- (चार कोटी बावन्न लाख पंचान्नव हजार पाचशे सदवतीस फक्त) इतकी रक्कम आपसी तडजोडीतुन वसुल करण्यात आलेली आहे.सदर लोकअदालतमध्ये तालुका विधी सेवा समिती, पुसद येथील पी. एन. भोयर, निलेश एम. खसाळे, कु. ए. डी. बेले, पि. ए. कोयरे, जे. जे. जाधव,एस. एन. पाथरकर, टी. जी. सुर्यवंशी, श्रीमती जे. बी. पवार, व्ही. आर. चावरे व ईतर ब-याच संख्येने न्यायालयीन कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता परिश्रम घेतले.



