राजकिय

पुसद मतदारसंघाच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची चाहूल; येत्या काळात परंपरागत राजकारणाला पर्याय उपलब्ध होण्याचे संकेत!

माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक साहेब यांच्या सुनबाई रखरखत्या उन्हात ह्या 'घरात बसू न राहता' ढवळून काढत आहेत संपूर्ण मतदारसंघ!

पुसद : विधानसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक साहेब यांचे सुपुत्र निरंजन नाईक यांच्या सौभाग्यवती ह्या रखरखत्या ऊन्हात ‘घरात बसून न राहता संपूर्ण मतदारसंघ सर्कलनिहाय प्रत्येक गाव, वाड्वया -स्त्यासह -तांड्याला भेटी देवून तळागाळातील नागरिकांशी संवाद साधत असून प्रत्येक गावच्या अडी-अडचणी समस्या जाणून घेत आहेत स्वातंत्र्य पूर्व काळापासून आजतागायत एकाच घराण्याची सत्ता असून ही हा मतदारसंघ विकासापासुन कोसो दूर असलेल्यांने ग्रामीण भाागातील नागरिक भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने टाहो फोडत असल्यााने या मतदारसंघांमध्ये त्यांचाा झंझावात सुरू असून त्या संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुुळे येत्या कााळात या मतदारसंघाच्या राजकारणात सत्ता बदलाची नवी लाट दिसून येत आहे. पारंपरिक राजकारणाच्या चौकटीबाहेर जाऊन जनतेतून काही तरुणांनी नाईक साहेबांच्या खऱ्या वारसदारांना घेऊन प्रस्थापित नेतृत्वाला चॅलेंज देत असल्याने त्यांना या मतदाार संघातुन अधिक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा या बदलत्या राजकीय वातावरणात येत्या काळात या मतदारसंघाला नवीन नेतृत्व मिळेल की काय.? असे संकेत दिसून येत आहेत.

 महाराष्ट्राच्या राजकारणात पुसद विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहे.तसेच नाईक घराण्याचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातून १९५२ पासून आतापर्यंत सलग नाईक घराण्यातील आमदार विधानसभेवर निवडून येतोय. त्याचप्रमाणे एकाच घरातून राज्याला दोन मुख्यमंत्रीसुद्धा याच मतदारसंघाने दिले होते या विधानसभा मतदारसंघ नाईक घराण्याची अविरत सत्ता आजतागायत कायम आहे. या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक साहेब तसेच सुधाकरराव नाईक साहेब यांच्या कार्यकाळात या मतदारसंघाला उभारणी मिळाली होती पुसदला एक राजकीय आणि विकासात्मक केंद्र म्हणून स्थापित केले होते. त्यांच्या कार्यकाळात या भागात कृषी क्षेत्र, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा पाया रचला गेला.माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पुसद मतदारसंघाला आधुनिक रूप देण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात सिंचन प्रकल्प, रस्ते आणि ग्रामीण विकासाच्या कामांना मोठी गती मिळाली होती.पुसद हे केवळ राजकीयदृष्ट्याच नव्हे, तर विकासाच्या बाबतीतही एक सक्षम मतदारसंघ म्हणून उभा राहिला, हे नाकारता येणार नाही.पंरतु या मतदारसंघाला पुढील काळात उतरती कळा लागली. एकेकाळी रोजगाराने गजबजलेलं हे शहर सद्यस्थितीत पूर्णत: बकाल झाले आहे.सहकार क्षेत्र राजकीय उदासीनता आणि गैरव्यवस्थापनामुळे डबघाईस आले रोजगाराचे स्त्रोत आटले आहेत. कापड गिरणी, सुधाकर नाईक साखर कारखाना, जिनिंग, दूध डेअरी, व्यवसाय, सहकार तत्वावर चालणाऱ्या दूध संस्था अशा भक्कम पायाभरणीने उद्योग विस्तारला होता. काहींच्या आता फक्त स्मृतीच उरल्या आहेत. आज हजारो हाताना काम आणि पोटाला भाकर देणारा हा उद्योग पूर्णत: मोडकळीस आला आहे. गेल्या काही वर्षापासून पुसद तालुक्यातील एकही मोठा उद्योग उभा राहिला नाही. उलट जुन्या संस्थां संपूर्ण  बंद पडल्या तर काही मरणासन्न अवस्थेत आहे. हाताला काम नसल्यामुळे दरवर्षी पुसद मतदारसंघातून ५० हजारांच्या वर मजूर महानगरांकडे कामाच्या शोधात पोटाची खळगी भरण्यासाठी जातात.या मतदारसंघात आजही वाड्या- वस्त्या तांडे आणि दुर्गम खेड्यांचे प्रमाण अधिक आहे.‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी’ ही शासनाची घोषणा असली तरी आजही या बरीचशी खेडी अशी आहेत, की दर्जाचेदार रस्ते नसल्याने जेथे अद्यापही परिवहन महामंडळाची बसही पोहोचलेली नाही. ग्रामीण भागात चांगले आरोग्य सेवा, स्वच्छ पिण्याचे पाणी, दर्जेदार शिक्षण अशा भौतिक सुविधांपासून नागरिक वंचित आहेत.वर्षानुवर्ष एकाच घराण्याची एकहती सत्ता असून हे सत्ताधाऱ्यांना या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यास अपयश आले आहे. परंतु आजवर या मतदारसंघाने याच घराण्यांत सत्तेसाठी मात्र गृहयुद्ध पाहायला मिळाले आहे.काका पुतण्या, चुलत भाऊ यांच्यात लढाई पहायला मिळाली. गेल्या  विधानसभा निवडणुकीत थेट दोन सख्खे भाऊ सुध्दा आमनेसामने येऊन निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांविरोधात दंड थोपटू लागले होते त्यावेळी संपूर्ण मतदारसंघातील सर्वांचं या नाईक घराण्यांनी लक्ष वेधलं गेलं होतं. तेव्हापासून नाईक कुटुंबात उभी फूट पडली आहे.पंरतु माजी मंत्री मनोहरराव नाईक यांची मतदारसंघावर मोठी पकड आहे.त्यांना आदर देणारा त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणारा, मान देणारा, जीव लावणारा मोठा वर्ग आजही या भागात पाहायला मिळतोत्यामुळेच जनसामन्यांचा गराडा त्यांच्या भोवती कायम असल्याने त्याचकरणाने त्यांचे सुपुत्र इंदनील नाईक पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्याने विजयी झाले व महायुती सरकारच्या काळात साह खात्याचे राज्यमंत्री झाले परंतु त्यांना राज्यातील साह खात्यांचा कारभार सांभाळताना मात्र मतदार संघांतातील मतदारांचा व विकास कामाचा विसर पडत चालला आहे.वर्षानुवर्ष सत्ता असूनही हा संपूर्ण मतदारसंघ विकासापासुन कोसो दूर आहे.तर विकास कामांसाठी आलेल्या निधीतून विकास कामांना टक्केवारीचे ग्रहण लागले आहे.या मतदार संघाचा संपूर्ण कारभार कारभार त्यांच्या सौभाग्यवती सांभाळत असल्याने बंगल्यावर जुन्या कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध होत नाही तर नविन कार्यकर्तेच ठेकेदार झाल्याने मतदार संघातील अनेक विकास कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत तर सर्वसामान्य नागरिकांना व कार्यकर्त्यांना या ठेकेदारांची तक्रार कुठे करावी हाच प्रश्न पडला आहे जर एखाद्या सर्वसामान्य नागरिक किंवा जुना जाणता कार्यकर्ता तक्रार करण्यास राज्य मंत्र्यांकडे गेला तर आधीच त्यांच्या गावाचे विकास कामे करणारे ठेकेदारांचा गराडा त्यांना पडला असतो त्यामुळे ते कार्यकर्ते हाताश होवून गावी परततात त्यामुळे मतदार संघातील सर्व सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पाहावयास मिळत आहे. दुसरीकडे मतदार संघातील अनेक प्रश्न आव वासुण उभे आहेत मतदारसंघात तांडे, वाड्या आणि वस्त्यांवर आजही  मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळत आहे.तरही या मतदारसंघात नाईकांच्या या अभेद्य गडाला आजपर्यंत कुणीही खिंडार पाडू शकले नाही.मात्र आता या बालेकिल्ल्यात लक्ष घालण्याची गरज आहे.येणाऱ्या काळात  पुसद मतदारसंघांत नेतृत्व फेरबदलाचे संकेत दिसून येत आहेत.माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक साहेब यांच्या सुनबाईनी भर उन्हाळ्यात सूर्य आग ओकू लागला

तरीही घरात न बसता संपूर्ण मतदार संघातील तांडे, वाड्या वस्त्या ढवळून काढत आहेत.तर प्रत्येक गावात जाऊन  ‘गावभेटी’ घेऊन मतदारांशी थेट संवाद साधत विकास कामांचा आढावा घेत असताना त्या गावातील विकासकामे कां रखडले त्याबाबत संबंधित अधिकारी ठेकेदारांना जाब विचारीत आहेत.त्यांचा हे रखरखत्या उन्हातील झंझावात दौरा हा या मतदारसंघातील येत्या काळातील फेरबदलाचे संकेत दिसून येत आहेत त्यामुळे येत्या काळात पुसद विधानसभा मतदारसंघांच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची चाहूल लागली असून परंपरागत राजकारणाला पर्याय म्हणून नवीन चेहरे राजकारणात दिसतील अशी आस या मतदारसंघात पुन्हा निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close