ईतर

दानशूर समाजसेवक मनीषभाऊ शहा यांच्या उत्तम आरोग्यासाठी ठीक ठिकाणी प्रार्थना व विविध कार्यक्रम! पुसद मधील विविध सामाजिक संघटना व मनीषभाऊ शाह मित्र मंडळातर्फे गरजवंतांना फळे बिस्किट बुंदीचे लाडू वाटप….

 पुसद : येथील विविध सामाजिक संघटना व मनीषभाऊ शाह मित्र मंडळातर्फे गरजवंतांना दानशूर समाजसेवक मनीषभाऊ शहा यांच्या उत्तम आरोग्यासाठी ठीक ठिकाणी प्रार्थना व विविध कार्यक्रम! पुसद मधील विविध सामाजिक संघटना व मनीषभाऊ शाह मित्र मंडळातर्फे गरजवंतांना फळे बिस्किट बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले .गोरगरीब व गरजवंतांचे आधारवड तसेच सामाजिक कार्यात नेहमी मदतीचा हात देणारे, लोकप्रिय व्यक्तिमत्त्व.  मनीषभाऊ शहा यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पुसद येथे विविध सेवाभावी संघटनेतर्फे फळे,बिस्कीट व बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले. पुसद परिसरातील गरजवंतांना मदत करून नेहमी सहकार्य करणे व माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन अंतर्गत नव्याने सुरू होत असलेल्या माणुसकीची भिंत शांताई वृद्धाश्रम व बेघर निवारा केंद्र या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी मनीषभाऊ शहा यांचे अत्यंत मोलाचे आणि सर्वात मोठे सहकार्य लाभत आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे खालावली. त्यामुळे ते लवकरात लवकर पूर्णपणे निरोगी व्हावेत या सदिच्छेने शहरातील सामाजिक संघटना एकत्र येऊन त्यांच्या शीघ्र आरोग्यलाभासाठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयातील माणुसकीची भिंत मदत केंद्र पुसद येथे गरजू प्रभुजींना ताजी फळे, बिस्किटे आणि बुंदीचे लाडू वाटप केले व त्यांची तब्येत लवकर चांगली व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली यावेळे मनीषभाऊ मित्र मंडळ, माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था, रुग्ण मित्र फाउंडेशन,गुरुदेव सेवा मंडळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close