शैक्षणिक

श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान व गणित प्रदर्शनी उत्साहात साजरी; सर्जनशील विद्यार्थ्यांच्या पाठीमागे शाळा खंबीरपणे उभी आहे* -प्राचार्य दत्तात्रय जीवने

पुसद : शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता, चिकित्सक विचारसरणी आणि सर्जनशीलतेला चालना देण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुसद येथे शालेय स्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनी उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली . विज्ञान विभाग प्रमुख सविता घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दत्तात्रेय जीवने, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक प्रज्ञा गडदे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. गजानन जाधव विज्ञान विभागाचे प्रा़ आसिफ शेख गणित शिक्षक चैतन्य ठाकरे उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. ए पी जे अब्दुल कलाम व देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

विज्ञान आपल्या अवतीभवती आहे. ते समजून घेऊन त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करणे हीच खरी विज्ञानाची जाणीव आहे,” असे प्रतिपादन उपमुख्याध्यापक प्रज्ञा गडदे यांनी केले.

प्रा. गजानन जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येकाच्या घरी निर्माल्य कुंड तयार करून निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय जीवनी यांनी शालेय विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी शाळा आपल्या पाठीमागे सर्वतोपरी खंबीरपणे उभी आहे असा विश्वास व्यक्त केला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख प्रणिता मंदाडे तर सुजल देशमुख व सिद्धांत पवार, लक्षवेधी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले,सुमित पतंगे यांनी सादर केलेल्या विज्ञान गीताने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शालेय मंत्रिमंडळाचे शिक्षणमंत्री विवेक राठोड, प्रा. मोनिका मंदाडे यांनी प्रदर्शनीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचालन जयश्री आसोले यांनी तर आभार प्रदर्शन अलका चव्हाण यांनी केले. त्यानंतर मान्यवरांसह विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शालेय प्रदर्शनी ची पाहणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close