पुसद जिल्हा भाजपमध्ये अंतर्गत कलह; वरिष्ठ नेत्यांकडे जिल्हाध्यक्षाच्या राजीनाम्याची जिल्ह्यातील १७ शहराध्यक्षांनी केली मागणी!
भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली;वाद वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात!

पुसद : देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षात नेहमीच नेतृत्वाकडून नेहमीच शिस्त, पारदर्शकता आणि सुशासन असल्याचा दावा केला जातो. मात्र, अलीकडच्या काळात स्थानिक पातळीवर अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांमधील मतभेद उघडपणे समोर येत आहेत. पुसद भाजप जिल्ह्यात मात्र अंतर्गत कलह आणि गटबाजी उफाळून आली असून पक्षातील पदाधिकारी खुल्या एकमेकांच्या विरोधात भूमिका घेताना दिसून येत असल्याची गटबाजी स्थानिक पातळीपर्यंत उघडपणे चव्हाट्यावर येत आहे. पक्षाची शिस्त आणि संघटन ही भाजपची सर्वात मोठी ताकद मानली जात असली, तरी गेल्या काही काळात स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडींमुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत कलह निर्माण झाल्याने पक्षाला मोठा फटका बसला. नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठे अपयश आले आहे. त्यामुळे पुसद जिल्हा भाजपचे जिल्हाअध्यक्षांना पक्षात संघटनात्मक बांधणीत मोठे अपयश आल्याने पक्षातील जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून जवळपास जिल्ह्यातील १७ शहराध्यक्षांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात जिल्हाध्यक्षाच्या विरोधात व्यथा मांडली असून तात्काळ जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक भारतीय जनता पक्षात येत्या काळात पुसद जिल्ह्यात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जात असल्याची सूत्राची माहिती आहे.
त्यानुसार येत्या काळात संघटनात्मक बदल करण्याचे संकेत दिसून येत असल्याने भारतीय जनता पक्षात वरिष्ठ नेतृत्व काय निर्णय घेणार किती जणांच्या हाती नारळ दिले जाणार याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता कुणाला पक्षात झटका बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कींवा काम करणाऱ्यांना संधी मिळते की समीकरणांनाच प्राधान्य?”असे प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात कायम आहेत.गेल्या काही दिवसांपासून पुसद विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन आले होते आणि भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असताना सुद्धा पक्षांतर्गत पदे आणि जबाबदाऱ्यांवरून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिकीट वाटपावरून काही दिवसापासून या पक्षांतर्गत कलह सुरू झाला आहे. स्थानिक भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.तर ही पक्षांतर्गत गटबाजी आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नेत्यांना चक्कं अपयश आले आहे.तर पक्षांतर्गत ही गटबाजी नेमकी आटोक्यात येणार की पुन्हा डोके वर काढणार, असा सवाल आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात पुसद भाजप जिल्ह्यांतर्गत काही पदाधिकाऱ्यांनी राज्याचे महसूल मंत्री व भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे व आमदार संजय कुटे भाजपा सरचिटणीस महाराष्ट्र यांच्या दरबारात जिल्हा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार केली असून पक्ष बांधणीसाठी व पक्षातील वाद शमविण्यास जिल्हाध्यक्षांना अपयश येत असल्याने जिल्हाध्यक्षाचा तात्काळ राजीनामा घ्यावा नाहीतर तालुका पातळीवर व शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देणार असल्याची धमकी दिल्याची माहिती असून वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर आत्ता कार्यरत जिल्हाध्यक्ष राजीनामा देतील का याकडे सर्व पुसद जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. त्यामुळे स्थानिक भारतीय जनता पक्षात राजकीय हालचालींमुळे एकच खळबळ उडाली आहे.गेल्या काही वर्षांत पुसद शहरात भारतीय जनता पक्षान आपली संघटना विस्तारली असून शहरातील अनेक काही मोठ्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी या पक्षात प्रवेश केल्याचे चित्र दिसून येत होते पक्ष प्रवेशानंतर येथे पक्षाचा विस्तार मोठा होताना दिसत असताना विविध स्तरांतून पक्षात नव्या कार्यकर्त्यांचे ‘इनकमिंग’ वाढले होते. मात्र जुन्या-नव्यांचा समन्वयाचा मुद्दा देखील आता ऐरणीवर आला आहे. नव्या कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देताना दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची तीव्र भावना समोर येत आहे. तर जुन्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेऊन योग्य स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या जुन्या-नव्यावरूनच भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगले असून राजीनामा नाट्याला देखील सुरुवात झाल्याचे समोर आले आहेत.तर पक्षातील काहींनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात आपल्याच पक्षातील उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्याने तसेच आपल्याच पक्षातील आपल्याच उमेदवारासाठी लाखो रुपये घेऊन सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याने आपल्या पक्षाला मोठा प्रभाव सहन करावा लागला त्यामुळे या पक्षात पक्षांतर्गत कल अजूनही मिळता मिटेना झाला आहे. पक्षाची धुरा ज्या पदाधिकाऱ्याच्या हातात आहे ते पदाधिकारी सुद्धा या पक्षांतर्गत कलह मिटवण्याऐवजी या गटबाजीला खतपाणी घालत असल्याचे दिसून येत असून उलट पक्षाची तुकडे तुकडे गॅंग मध्ये विभाजन करण्याच्या तयारीला लागले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत कलह नाराजी व्यक्त केल्या जात आहे. यामागे पक्षातील गटबाजी आणि राजकीय कुरघोड्या व तक्रारी असून एकमेकांविरूद्ध छुप्या पद्धतीने डाव खेळले जात आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षात आलबेल नसून अंतर्गत वाद उफाळून येतोयत तर अनेक वर्षापासून गाव पातळीवरील नगर परिषदेच्या नंतर मिनी विधानसभा असलेल्या निवडणुका रखडल्या आहेत परंतु येत्या काळात ह्या निवडणुका होण्याची संकेत आहे तर गाव पातळीवर जिल्हा परिषद गटावर अनेक मातब्बर मंडळींच्या नजरा आहेत. मानाचे पद असलेल्या या पदावर वर्णी लागावी म्हणून गेल्या काही वर्षापासून झटून काम करणाऱ्या तरूण मंडळीची धाकधुक देखील वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केलीय. या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनात्मक बळकटीसाठी माजी आमदार ॲड.निलय भाऊ नाईक यांच्याकडे ही जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे पहिले तर, नगरपरिषद निवडणुकीत भाजपची खराब कामगिरीमुळे आणि पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे या पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला आणि कुबड्याच्या साह्याने नगर परिषदेच्या सत्तेमध्ये सामील झाले परंतु तिथेही हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने पक्षाची वाहतात सुरू आहे.तर पक्षातील स्थानिक जिल्हाध्यक्षांनी पक्षांतर्गत पक्ष वाढीसाठी प्रयत्न केल्याचे किंवा पक्षांतर्गत गटबाजी शमविण्यास प्रयत्न न केल्याने येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला स्थानिक पातळीवर पक्षातील अंतर्गत कलह व गटबाजी होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही तरीही गटबाजी आटोक्यात येणार की पुन्हा डोके वर काढणार, असा सवाल आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आता तरीही पक्षातील अंतर्गत गटबाजी व कलह थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या दरबारात पोहोचल्याने स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत कार्यकारिणीमध्ये किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल केल्यास या पक्षाला उभारी मिळू शकेल अन्यथा हा पक्ष या विधानसभा मतदारसंघात लयास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु या पक्षातील अंतर्गत कलह व गटबाजीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



