श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात रासेयो वर्धापन दिन विविध उपक्रमाने साजरा!
आपले यश संगतीवर अवलंबून असते-दशरथ सूर्यवंशी

पुसद :शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावती अंतर्गत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पुसद येथे २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस व सेवा संकल्प अभियान विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळ सत्रात श्रमदान अंतर्गत शालेय परिसर स्वच्छता वृक्षारोपण वृक्ष संगोपनासाठी झाडांना आळे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले याप्रसंगी प्रबोधन पर व्याख्यानात संत साहित्याचे अभ्यासक दशरथ सूर्यवंशी यांनी वरील मार्मिक विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य दत्तात्रेय जीवने, प्रमुख वक्ते संत साहित्याचे अभ्यासक युवा कीर्तनकार तथा उच्च श्रेणी मुख्याध्यापक काळी दौ. येथील दशरथ सूर्यवंशी,प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रज्ञा गडदे जिल्हा समन्वयक प्रा गजानन जाधव,शालेय मंत्रिमंडळ मुख्यमंत्री नारायण ढाले विचार पिठावर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,गाडगे महाराज व देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिवचैतन्यी पुलाते हिच्या स्वागत गीताने व शिवानी चव्हाण,आरती जाधव, नंदिनी चव्हाण यांच्या रासेयो प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक भाषणात प्रा गजानन जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापने मागील भूमिका व उद्देश स्पष्ट करून या दिवसाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर राष्ट्रसेवा हीच ईश्वर सेवा या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते दशरथ सूर्यवंशी म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना हे एक सेवाभावी संघटन आहे त्याच्या माध्यमातून समाजाची सेवा व समाजाप्रती उत्तरदायित्व पूर्ण करताना राष्ट्रातल्या गरजू व्यक्तीची सेवा पर्यायाने राष्ट्राची होणारी सेवा हीच ईश्वर सेवा आहे तरुणांनी आपली संगत योग्य मित्रासोबत ठेवावी कारण आपले यश आपल्या संगतीवर अवलंबून असते एकाच किमतीच्या दोन भरण्या पैकी एका भरणीत मीठ ठेवले आणि एका भरणीत तूप ठेवले तर त्या भरणीची किंमत बदलते आपण ज्याच्या संगतीत जाऊ त्याप्रमाणे आपल्याला किंमत प्राप्त होते.
तरुणांनी निर्व्यसनी बनावे असाही मौलिक सल्ला त्यांनी दिला. याप्रसंगी पूजा वाहुळे हिने आपले मत व्यक्त केले उपप्राचार्य प्रज्ञा गडदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांमध्ये कर्तुत्व नेतृत्व आणि वक्तृत्व सिद्ध करणारे विचारपीठ आहे असे सांगितले.
याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी विक्रम राठोड व विद्यार्थिनी प्रतिनिधी चेतना संजय जाधव यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना बॅच व डायरी देऊन पदभार देण्यात आला सोबतच नवनियुक्त कार्यकारी कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. अमोल राठोड यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रणाली कांबळे तर विक्रम राठोड यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.भाऊसाहेब देशमुख प्रा योगिता काष्टे प्रा. असिफ शेख प्रा.मोनिका मंदाडे, कार्तिक राठोड यश चव्हाण कावेरी राठोड यांनी पुढाकार घेतला यावेळी राष्ट्रीय सेवा योजना सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



