क्राइम

पुसद ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ;चोरीस गेलेली मोटरसायकल काही तासात आरोपीकडून जप्त! आरोपीस ठोकल्या बेड्या!

पुसद: ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटर सायकल चोरट्यास पोलिसांनी अवघ्या काही तासात मोटरसायकल सह आरोपीस ठोकल्या  बेड्या. ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी नामे शेख राजीक शेख हुसेन वय २९ वर्ष रा. शादी खाना जवळ वसंतनगर, पुसद यांनी दिनांक २८जुन२०२६ रोजी तक्रार दिली की, ते वापरत असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर आय स्मार्ट सिल्व्हर लाल रंगाची मोटर सायकल क्रमांक एम २९ ए. एस. ८२९४ कि. ४०,०००/- रुपयाची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे गुन्हां रजि. नं. ४२२/ २०२६ कलम ३०३ (२) भा. न्या. संहीता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधिक्षक, यवताळ यांनी सदर गुन्हा उघडीस आणणेबाबत आदेशीत केले होते.

सदर गुन्ह्यांचे गांभीर्य तात्काळ घटनास्थळ भेट दिली. मात्र सदर घटनास्थळी सी. सी. टि. व्ही. कॅमेरा दिसुन आले नाही. पोलीस स्टाफसह ग्राम मांडवा येथे जावुन गुन्ह्यात चोरी गेलेल्या मोटर सायकल व अज्ञात आरोपीबाबत चौकशी करीत असतांना गुप्त बातमीदारांना माहीती काढणेबाबत नेमण्यात आले. दि. २८ जून २०२६ रोजीचे रात्री अं. १.३० वाजताच्या सुमारास गुप्त बातमी दाराने खात्रीलायक माहीती दिली की, गुन्ह्यात चोरी गेलेली मोटर सायकल हि ग्राम मांडवा येथील इसम नामे प्रमोद देवराव चिरमाडे वय २९ वर्ष याचेजवळ असुन तो मोटर सायकल चालवितांना दिसला अशी खात्रीलायक माहीती प्राप्त झाल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे कडे गुन्ह्यासंबंधाने अधिक चौकशी केली असता. सदर इसमाने सुरुवातील उडवा उडवीचे असमाधानकारक उत्तरे देवुन कोणतीही उपयुक्त माहीती देत नसल्याने पोलीस कौशल्याचा वापर करुन कसोशीने तपास केला असता सदर इसमाने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन सदर गुन्ह्यात चोरी गेलेली जुनी वापरती हिरो कंपनीची स्प्लेंडर आय स्मार्ट सिलव्हर लाल रंगाची मोटर सायकल क्रमांक एमएच २९ एएस ८२९४ किंमत ४०,००० रूपयांची जप्त करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा तपास स. फौ/शेख मसुद पोलीस ठाणे पुसद ग्रामीण हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद / उमरखेड हनुमंतराव गायकवाड, पो. नि., स्था. गु. शा. यवतमाळ यांच े नेतृत्वात ठाणेदार आशिष चौधरी, स. फौ शेख मसुद, पोहवा रविंद्र गावंडे, पोहवा ज्ञानेश्वर मस्के, पो.अं. योगेश आळणे, पो. अं. केशव मुंढे, पो. कॉ. अक्षय मोटे, पोशि मो. ताज पो. स्टे. पुसद ग्रामीण यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close