राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३९६ प्रकरणे निकाली;३ कोटी ९ लाख ३८हजार ३७२ रुपयाची अपसी तडजोडीतून वसुली!

पुसदः येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. या लोकअदालतमध्ये चार पॅनलच्या माध्यमातुन ३९६ प्रकरणे निकाली काढण्यात आली असुन त्यातुन ३ कोटी ९ लाख ३८ हजार ३७२ रुपयांची वसुली करण्यात आली.जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश, पुसद तथा तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा श्रीमती एस.जे. रामगडीया यांच्या अध्यक्षतेखाली लोकअदालत संपन्न झाली. यावेळी तडजोड पात्र दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक, मोटार अपघात दावे, बॅक प्रकरणे, दाखलपुर्व प्रकरणे, विद्युत देयके, फायनान्स प्रकरणांचा समावेश होता.या लोककलांमध्ये ३९३ दिवाणी व फौजदारी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, तर ३ दाखलपुर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे एकुण ३९६ प्रकरणांचा यशस्वी निकाल लावण्यात आला. लोकअदालत पॅनल प्रमुख म्हणुन श्रीमती एस.जे. रामगडीया, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, पुसद तथा जिल्हा न्यायाधीश – १ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश, पुसद तर पॅनल क्रमांक -१ श्रीमती एस.एन. शाह, तदर्थ जिल्हा न्यायाधीश – १, पुसद, पॅनल क्रमांक-२ ए.एस. अत्रे, दिवाणी न्यायाधीश व. स्तर, पुसद, पॅनल क्र.-३ श्रीमती व्ही.डी. बिरहारी, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद, पॅनल क्र. ४ श्रीमती ए.यु. यादव, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद यांनी काम पाहिले.विधीज्ञ तथा पुसद वकील संघाचे सदस्य ॲड.तनवीर खान, श्रीमती एस. आर. नरवाडे, श्रीमती एम.यु. सगने,ए.एम. पाठक यांनी पॅनल पंच म्हणुन सहभाग घेतला.यावेळी एका मोटार अपघात दावा प्रकरणामध्ये आवेदकास नॅशनल इंशुरन्स कंपनीतर्फे ६१ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. यावेळी आवेदकातर्फे एस.बी. बिडवई यांनी तर विमा कंपनीतर्फे ॲड. ए.व्ही. चिदरवार यांनी काम पाहिले.तसेच एका कौटुंबिक प्रकरणात उभय पक्षांमधील कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. न्यायालयातील समुपदेशन व मध्यस्तीमुळे दोन्ही जोडप्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या जोडप्यांच्या संसाराची वेल पुन्हा बहरणार आहे.यावेळी बँकांचे अधिकारी व कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. तसेच या लोकअदालतीच्या यशस्वितेसाठी श्रीमती एस.जे. रामगडीया, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, पुसद तथा जिल्हा न्यायाधीश – १ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश, पुसद यांचे मार्गदर्शन लाभले.
लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सहाय्यक अधिक्षक एस.आर. राठोड, आर.एस. चौधरी,एस.एम. पांगारकर,जे.एस. ढगे, श्री.एस.आर. ढाले,सी.पी. लोखंडे,सी.एम. वानखेडे,पी. झेड. राठोड,के. आर. ठाकरे, एन.वाय. माथने, शएम.व्ही. कोत्तावार,आर. के. बेरदेवाड, एस.व्ही. बंड्रप, एन.आर. लोंढे,एस.एल. नाटकर,व्ही. के. जाधव,एस.ए. पुजरवार,यु.एच. बन्सोड,आर.एस. गजभिये, एस.एस. महाजन, श्रीमती एस.एस. भागवत,एस.बी. कोल्हे,एस.बी. दिगोळे,एस. के. बोडखे,आर.एस. सोमवारे, एम.व्ही जाधव,एस.एम. जाधव, श्रीमती डी.डी. शिंदे,एन.व्ही. कांबळे,व्ही.बी. वानखेडे,ए.पी. गुध्दटवार, ए. आर दातीर,पी.एस. बडोणे, डी.बी. मनवर, सौ. जे. बी. पवार, डी.पी.वाघ मारे,आर. के. सगमे, एस.आर. बाराहाते, व्ही. के. जाधव, जी.एल. चंदनकर, व्ही. आर. मंचलवार, आर.डी. नप्ते तसेच सर्व न्यायालयीन कर्म-यांनी सहकार्य केले.



