शैक्षणिक

श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय पुसद निकालाची उज्वल परंपरा कायम!विज्ञान शाखा ९४. २३% तर कला शाखा ९०.४७% निकाल.

पुसद:स्थानिक श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय पुसद यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा वर्ग १२ वी चा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून या निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेचा ९४.२३% तर कला शाखेचा ९०.४७% निकाल लागलेला असून कला शाखेतून कु. छकुली मांगीलाल पवार ७८.६७% -प्रथम क्रमांक ,कु. अवंतीका आनंदा जाधव ७८% – द्वितीय क्रमांक तर कु. ऋतुजा संजय राठोड ७४.५०% – तृतीय क्रमांक आणि विज्ञान शाखेतून समाधान सुरेश राठोड ७२. ८३% -प्रथम क्रमांक कु. काजल देवानंद चव्हाण ६९.६७% -द्वितीय क्रमांक कु. प्रथमेश बालाजी हुडेकर ६९.३३% -तृतीय क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. कला शाखेमध्ये प्राविण्य श्रेणी मध्ये ३, प्रथम श्रेणीमध्ये १८ तर विज्ञान शाखेमध्ये प्रथम श्रेणामध्ये १८ विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे. सर्व यशस्वी गुणवान विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, सचिव अश्विनी पाटील चोंढीकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य रामचंद्र हिरवे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय जीवने, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close