दहावी सीबीएसईच्या निकालात माऊंट लिटरा ‘झि’ स्कूल पुसदचे घवघवीत यश!गुणवत्तेची परंपरा ठेवली कायम!

पुसद : नुकताच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात येथील माऊंट लिटरा ‘झि’ या सीबीएसई स्कूलने उल्लेखनिय यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली. या शाळेने १०० टक्के निकाल दिला असून त्यामध्ये साह विद्यार्थ्यांने ९० टक्क्या पेक्षा अधिक गुण मिळवले आहे तर १५ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.यावर्षीच्या माऊंट लिटरा ‘झि’ स्कूल पुसदच्या ३१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.त्यामुळे माउंट लिट्रा झी स्कूलचे इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
पुसद शहरातील व तालुक्यातील परिसरामधील विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यामध्ये इंटरनेट, कॉम्प्युटर, अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना शाळेप्रति उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे या उदात्तहेतूने या संचालक मंडळांनी या शहराच्या परिसरात सन २०१९ माऊंट लिटरा झि स्कूल ची सुरुवात केली तेव्हापासून या स्कूल ने अल्पावधीतच यशाची शिखर गाठले आहे मागील तीन वर्षापासून इयत्ता दहावीचा सीबीएसई शंभर टक्के निकाल देणारी संस्था म्हणून ही स्कूल नावारूपाला आलेली आहे स्कूलने सन २०१९ मध्ये १८० विद्यार्थ्यावर सुरुवात करून आज जवळपास ११०० विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्वल करीत आहे यावर्षी सीबीएससी इयत्ता दहावीच्या निकालामध्ये संस्थेच्या सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले असून त्यामध्ये एकूण सहा विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण घेतलेले आहे तसेच पंधरा विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा अधिक गुण मिळवून यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे झी स्कूलच्या माध्यमातून परिसरामध्ये एक उत्कृष्ट अशी सीबीएसई ची शाळा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे, त्यामुळे या शाळेने अल्पवधीतच नावलौकिक मिळवला आहे तसेच विविध उपक्रमासाठी आणि विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सदैव काम करीत आहे.या शाळेच्या यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापनाने अभिमान व्यक्त केला आहे. संस्थेचे संचालक मंडळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षकांचे समर्पण आणि पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगितले.शाळेचे शैक्षणिक संचालक शबनम मॅडम, समन्वयक, व्यवस्थापक यांनी विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना भविष्यातही उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. माऊंट लिटरा ‘झि’ स्कूलचे हे यश गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण आणि सर्वांगिन विकासाच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.


