राजकिय

प्रा.अर्चना हरिमकर यांची ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती !

पुसद :येथील सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. अर्चना दीपक हरिमकर यांची ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कडून मुंबई येथे आयोजित पक्ष कार्यक्रमात राजा राजापूरकर प्रदेशाध्यक्ष ओबीसी यांच्या मार्फत नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे हस्ते ,राष्ट्रीय नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हे नियुक्ती पत्र देण्यात आले .अर्चना हरिमकर ह्या पुसद येथील नामांकित शाळेत अध्यापनाचे कार्य करीत असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय महिला असून महिला सक्षमीकरनासाठी त्यांची पक्षस्तरावर नियुक्ती जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण राहणार आहे. पक्षाची विचारधारा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनां अभिप्रेत असणारी संघटना व पक्ष बांधणी करून शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी त्या प्रयत्नशील राहनार असल्याचे प्रा.अर्चना हरिमकर वृत्त संस्थांशी बोलताना म्हणाल्या. या निवडीचे श्रेय शरद मैंद प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व पक्षातील पुसद विभागातील सर्व कार्यकर्त्यांना प्रा.अर्चना हरिमकर देतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close