क्राइम

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई;आर्णी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर-तुळजापूर हायवे लगत ढाब्यावर चालु असलेल्या ड्रग्स विक्रीचा भांडाफोड! 

आर्णीच्या स्थानिक पोलीसांच्या कारभार मात्र प्रश्नचिन्ह!

यवतमाळ:जिल्ह्यातील आर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागपूर -तुळजापुर हायवे लगत धाब्यावर अंमली पदार्थ ड्रग्स विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, तबल ३३५२४५/- रुपयांच्या जवळपास १८की,१५ग्राम Heroine (चिट्टा) ड्रग्स व २७की७२१ग्राम Poppy Strawडोडा पावडर,व हा अमली पदार्थ जप्त केला आहे. धक्कादायक म्हणजे या ड्रग्ज प्रकरणात आर्णी तालुक्यातील सुकळी शिवारात नागपूर -तुळजापुर हायवे लगत धाब्यावर अंमली पदार्थ ड्रग्स विक्री करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे.पंरतु स्थानिक पोलीसांना मात्र या धाब्यावर अंमली पदार्थ ड्रग्स विक्री सुरू असल्याची कुणकुण सुद्धा लागली नाही किंवा स्थानिक पोलीस जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत की काय.?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.कारण नुकताच आर्णी तालुक्यातील लोणबेहळ परिरसरातील बार आणि ढाबाही चर्चेत आला होता हायप्रोफाइल ललना आणून देहविक्री व्यवसाय चालविला जात असल्याची मोठी चर्चा झाली होती आणि पोलिसांनी टाकलेली धाडी संदर्भात सुद्धा जिल्ह्यात चर्चेला उधाण आले होते.आणि ति धाड कोणी मॅनेज केल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र आता पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अंमली पदार्थ ड्रग्सवर कारवाई केल्याने स्थानिक पोलीसांच्या कारभार प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक पोलीसांचे पितळ उघडे पडले आहे. या कारवाईने पोलिस दलासह यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की,यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो. से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दि,१८ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना १५/३० वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन आर्णी हददीतील सरबजीतहसंग ऊर्फ करण ढिलोन हा त्याचे मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाबा येथे अंमली पदार्थ Heroin (चिट्टा) व Poppy Straw (डोडा पावडर) अंमली पदार्थ विक्री करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने त्या संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस स्टेशन आर्णी हददीत मौजे सुकळी शिवारातील नागपूर- तुळजापूर हायवे लगत असलेल्या सरबजीतसिंग ऊर्फ करण ढिलोन यांचे दशमेश पंजाबी ढाबा येथे रात्री १९/३० वाजता राजपत्रीत अधिकारी, कृषी अधिकारी, पंच व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अतिशय कौशल्यपुर्णरितीने छापा टाकून दोन इसमांस ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव १) सरबजीतसिंग ऊर्फ करण भुटटासिंग ढिलोन वय ३७ वर्ष, रा. दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आर्णि जि. यवतमाळ २) जगिरसिंग मख्त्यारसिंग सिंधू वय ५३ वर्ष, रा. दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आर्णि जि. यवतमाळ असे सांगितले. त्याचे समक्ष दशमेश पंजाबी ढाबा यांची झडती घेतली असता ढाब्यामध्ये अंमली पदार्थ १८.१५ ग्रॅम Heroin (चिट्टा) किंमत १८१५००/- रु तसेच Poppy Straw (डोडा पावडर) २७ किलो ७२१ ग्रॅम किंमत १३८६०५/-व इतर साहीत्य असा एकूण ३३५२४५/- रुचा मुददेमाल जप्तीसह नमूद इसमा विरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १८९५ चे कलम ८(क), १५(ब), २१ (ब) अन्वये पोलीस स्टेशन आण येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असून यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा सिध्देश्वर भोरे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, सपोनि मनिष गावंडे, पोउपनि शरद लोहकरे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच मा. नायब तहसिलदार आर्णी संतोष आदगुलवाड, कृषी अधिकारी आर्णी आनंद बदखल, फॉरेन्सीक टिम यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close