पुसद येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ हजाराची मदत सुपूर्द!
२१ डिसेंबरच्या पुसद भाजपात मोठे फेरबदल होण्याची संकेत!

पुसद : येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ हजाराचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे आमदार परिणय फुके यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आला. राज्यात यंदाच्या पावसाळ्यातील परतीच्या पावसामुळे शेती पिके, घरदार, संसारोपयोगी साहित्य आणि शेती वाहून गेली आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबेची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ‘जीवनदायी’ ठरत आहे तर दुसरीकडे अशा आपत्तीग्रस्त अतिवृष्टीग्रस्त आणि पुरग्रस्त कुटुंबांना मदत व्हावी, या उदार हेतूने आपली सामाजिक बांधिलकी जपत पुसद येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी दि. १० डिसेंबर२५ रोजी आमदार प्रणिय फुके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांत राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत पुसद नगरपरिषदेच्या तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात आली व मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यांना पुढील काळात शहरातील व ग्रामीण भागातील राजकारणासाठी काही निर्देश सुद्धा दिले असल्याची माहिती सूत्रांची आहे. त्यामुळे पुसद शहरात भारतीय जनता पक्षात येणाऱ्या काळात मोठे किंवा २१ डिसेंबरच्या नंतर फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे, जिल्हा सरचिटणीस दीपकसिंह परिहार, पुसद जिल्हा कार्यालय मंत्री ॲड. विश्वास भवरे, उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनभैय्या जयस्वाल, जिल्हा उपाध्यक्ष रवी ग्यानचंदनी, जिल्हा उपाध्यक्ष योगेश राजे हे उपस्थित होते.



