राजकिय

पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांसाठी उमेदवारी अर्ज’पक्ष कार्यालयात उपलब्ध!

इच्छुक उमेदवारांनी २८ते३१ ऑक्टोंबर प्रयत्न अर्ज देण्याचे आवाहन!

पुसद : नगर परिषदेच्या पुढील महिन्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज हा नगरध्यक्षपदासह न.प.च्या १५ प्रभागातील म्हणजे ३१ नगरसेवकांच्या पदासाठी मागविण्यात येत आहेत त्यामुळे अनेक इच्छुक तरुण कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्त्यानी अर्ज दाखल करण्यासाठी पक्ष कार्यालयात जाऊन अर्ज भरून द्यावे. हे अर्ज २८ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर पर्यंत दाखल करता येणार आहेत. त्यानंतर या अर्जांची छाननी होऊन इच्छुक उमेदवारांची यादी अंतिम केली जाणार आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छा व्यक्त केल्यामुळे आता पक्षाने सुविधा उपलब्ध करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. नगर परिषदेच्या या निवडणुकीत १५ प्रभाग असुन नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडून द्यायचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीततील घटक पक्षांनी स्थानिक पातळीवर आजपर्यंत कोणताही आमच्याशी संपर्क साधला नसल्यामुळे काँग्रेस व इतर मित्र पक्षांना किती व कोणत्या जागा सोडणार हे अद्याप निश्चित नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तूर्त तरी सर्व जागांवर अर्ज भरता येणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांनी सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय आगामी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा करून न.प.च्या येणाऱ्या निवडणुकीचा आढावाही घेतला जाईल त्यानंतर आता इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत.या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात उपलब्ध करून दिले असल्याची माहिती नगर परिषदे पक्षाचे निवडणूक प्रमुख तथा शहराध्यक्ष डॉ .अकिल मेमन यांनी दिली आहे. अर्ज २८ ऑक्टोंबर जून ते ३१ ऑक्टोंबर या कालावधीत दुपारी १२ ते ३ या वेळेत स्वीकारण्यात येतील, असे त्यांनी आवाहन प्रसिध्दीपत्रकातुन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close