ईतर
चैतन्य ठाकरे सेट परीक्षा उत्तीर्ण

पुसद :स्थानिक महात्मा मुंगसाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री सुधाकरराव ठाकरे यांचे चिरंजीव चैतन्य सुधाकरराव ठाकरे यांनी नुकतीच सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट गणित विषयात उत्तीर्ण केली आहे. सदर परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपकेंद्र असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ७ एप्रिल २०२४रोजी घेण्यात आली होती. चैतन्य ठाकरे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चैतन्य आपल्या यशाचे श्रेय त्यांचे वडील श्री सुधाकरराव ठाकरे (माजी मुख्याध्यापक) व सौ.विद्याताई ठाकरे यांना देतात.



