राजकिय

विधानसभेत रम्मी खेळणारा, सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्र्याचा राजीनामा घ्या-शरद मैद प्रदेश सरचिटणीस राकाँ (एसपी) पक्षाची मागणी!

पुसद : विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेचे कामकाज चालू असताना ऑनलाईन रम्मी जुगार खेळणाऱ्या वादग्रस्त वाचाळवीर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या वतीने शरद मैंद प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देऊन मागणी करण्यात आली शेतकरी फाशी घेऊन मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय कृषी कर्ज माफिचे आश्वासन देऊन कर्जमाफी होत नसल्याने आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. पी एम- किसान, नमो शेतकरी सन्मान निधी उपलब्ध नाही या सारखे अनेक शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे, अपंगांचे प्रश्न असताना शेतकऱ्याबद्दल नेहमीच वादग्रस्त विधान करणारे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात विधानसभेचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रम्मी खेळत असल्याचा व्हीडिओ प्रसारित झाला.अश्या शेतकऱ्यांच्या जाणीव नसलेल्या कृषीमंत्र्याला तातडीने मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अश्या आशयाच्या निवेदणाद्वारे निषेध करण्यात आला या निवेदनावर सर्वश्री शरद मैंद, अनुकूल चव्हाण, ज्ञानेश्वर बेले, अकील मेमन, साहेबराव ठेंगे, नारायण क्षीरसागर, परमेश्वर जैस्वाल, धर्मेंद्र(नाना) जळगांवकर, दीपक जाधव, ऍड भारत जाधव, उत्तम चापके, सय्यद जहरोद्दीन सय्यद मुजफारोद्दीन, स्वप्नील जैस्वाल, नितीन पवार, पंडितराव देशमुख, दीपक तायवाडे, सतीश जाधव, दीपक हरिमकर, चक्रधर मुळे, जय दळवी, सय्यद नायाब सय्यद हबीब, प्रवीण कदम, संदेश रणवीर, दीपक अवचार ऍड शेख जुनेद शेख तहसील, धीरज कांबळे, आकाश साठे, गणेश दिंडे, अजित लोंढे, शेख आवेश शेख तहसील विशाल दुधाने,दत्ता शिंदे, नारायण जाधव, अमोल सोळंखे, सुमेध कुलदीपके, संतोष अंभोरे, अभिमन्यू शिंदे, विष्णू गुड्डरवार, पवन चव्हाण, भैय्या पाटील, श्रीकांत वानखेडे, कैलास जळगांवकर, गौरव सुकळकर, अक्षय तावडे आकाश दिंडे, प्रथमेश रोडेकर रहेमान चव्हाण, राज खान, शिवाशिष मूलकर, आशिष पाईकराव, सुमित पाईकराव यांच्या सह्या असून निवेदनाचा स्वीकार उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी केला व आपली मागणी मुख्यमंत्र्यापर्यंत पाठवण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार च्या कार्यकर्त्यांना यावेळी दिले. यावेळी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे तालुका व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शहर व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुसद तालुका एस टी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. सोसिअल मीडिया पुसद तालुका व पुसद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग पुसद तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close