श्री. शिवाजी विद्यालयाचा निकाल ९६.५९ टक्के

पुसद – मार्च- २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला. त्यामधे स्थानिक श्री. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद चा निकाल ९६.५९ टक्के लागला असुन सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये कु. सुप्रिया देशमुख ९५.८० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम आली आहे. कु. ऋतुजा सरगर ९२.६० टक्के द्वितीय क्रमांक, तर सौरभ पवार व तुषार राठोड ९२.४० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला असून सोबतच गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये हरी ओम धबडगे ९०.४० टक्के, रोशनी गडधने ९० टक्के ,सुदर्शन राठोड ९० टक्के, दिव्या कांबळे ९० टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. परिक्षेला एकूण २९४ विद्यार्थ्यी बसले पैकी २८४ उत्तीर्ण झाले असून ५८ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली असुन प्रथम श्रेणीत ७८ तर द्वितीय श्रेणीत १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल श्री. शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरूध्द पाटील चोंढीकर व सचिव अश्विनीताई पाटील चोंढीकर यांनी अभिनंदन तथा कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तद्वतच विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाबद्ल समाधान व्यक्त केले.मुख्याध्यापक रामचंद्र हिरवे, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



