ईतर

मारवाडी जवळ दोन चारचाकी कारची समोरासमोर धडक!

पुसद: तालुक्यातील माळपठारावरील खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतिल मारवाडी जवळ पुसद- वाशिम रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना दि.२६ जूनच्या ५:०० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गजानन गणपतराव नालाट वय ६४ रा. जठारपेठ अकोला फिर्यादी हे आपल्या पत्नी व मुलीसह त्यांच्या चारचाकी क्र एम एच ३०बी एस ५९९९ या वाहनाने माहूर येथून देवदर्शन आटोपून अकोला गावी परत जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी कारच्या वाहनातील आरोपीने वाहन क्रमांक इंडिगो इसी एम एच ३० पी४९६९ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून फिर्यादीच्या वाहनाला जबर धडक दिल्याने भीषण अपघात केला या अपघातात फिर्यादीच्या तोंडाला जबर मार लागला असून या अपघातात फिर्यादीचे सात दात पडून ते गंभीर जखमी झाला आहे तसेच फिर्यादीच्या पत्नी व मुलगी पण जखमी झाल्याने सदर फिर्यादीच्या वाहनाचे तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची बाब फिर्यादीने नमूद केली. जखमीला पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. या आशयाच्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध कलम २७९,३३७,३३८,४२७ भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close