Uncategorizedईतर

विद्यार्थ्याच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून अक्षपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या आरोपीला अखेर अटक

सोशल मीडियाचा 'असाही' वापर; पुसद शहरात धक्कादायक प्रकरण उजेडात

पुसद : इंटरनेट आणि विशेष करून समाज माध्यमांमुळे जग जवळ आले असले, तरी या माध्यमाचा गैरवापर अधिक होतो.पुसद तालुक्यातील काकडदाती मधुसूदन नगरातील रहिवासी असलेल्या एका तरुणाने मागील भांडणाचा सूड उगविण्यासाठी एका विद्यार्थ्यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या संदर्भात अक्षपार्ह अपमानास्पद पोस्ट व्हायरल केल्याने समाजात संतापाची लाट निर्माण झाली होती तर काहीवेळ तणाव निर्माण झाला होता परंतु त्यावेळी पोलिसाकडे सायबर गुन्ह्याची यंत्रणा असतांना सुद्धा पोलिसांनी कोणतीही शाहनिशा न करता जमावाच्या दबावाखाली येऊन घाई गडबडीत या प्रकरणी चक्क परीक्षा केंद्राला घेराव घालून एका विद्यार्थ्याला परीक्षा संपताच ताब्यात घेतले होते. त्यामुळे पोलिसांचा तपास चव्हाट्यावर आला असून या विद्यार्थ्याचे बनावट अकाउंट तयार करून दुसऱ्यानेच जुन्या भांडणाचा सूड उगविण्याच्या हेतूने अक्षपार्ह पोस्ट व्हायरल केली त्यामुळे सोशल मीडियाचा असाही वापर झाला असल्याची दुसरी बाजू शुक्रवारी, १४ फेब्रुवारी रोजी धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. गोरक्षनाथ लक्ष्मण शिंदे (वय १९, मधुसूदननगर काकडदाती, पुसद) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांचे नाव आहे. त्याने बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा जुन्या वादाचा सुड घेण्याच्या उद्देशाने ‘बनावट खाते’ तयार केले. त्यावरून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपीला शुक्रवारी१४ फेब्रुवारी रोजी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.परंतु या प्रकरणी या विद्यार्थ्याला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला आहे तर समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्टमुळे शहरात सामाजिक वातावरण टाईट झाले होते नागरिकही संतप्त झाले होते.नागरिकांनी शहर पोलिस स्टेशनवर धडक देत आरोपीला अटक करण्याची मागणी लावून धरली.त्यावेळी या विध्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता व या विद्यार्थ्यांला त्यांच्या कुटुंबियांना सुध्दा समाजाच्या रोषालाही सामोर जावं लागलं होतं जर पोलीस जमावाच्या दबावाखाली आले नसते कींवा पोलीसांनी सायबर सेल मार्फत त्या गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या केला असता तर या विद्यार्थ्यांला नाहक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले नसते त्यामुळे सोशल मीडियाचा ‘असाही’ वापर पुसद शहरात झाल्याचा धक्कादायक प्रकरण उजेडात आला आहे त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी.याप्रकरणाचा तपास अधिक पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचा तांत्रिक तपास पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, सहायक पोलिस धीरज बांडे, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश देशमुख, मनोज कदम, नीलेश उंचेकर, दिनेश सोळंके, आकाश बाभुळकर, शुद्धोधन भगत यांनी केला आहे.

समाज माध्यमाचा जपून व काळजीपूर्वक वापर करावा. अकाउंट तयार करून पोस्ट करणार्‍यांवर सायबर पोलिस विभाग लक्ष ठेवून आहे. असा प्रकार निदर्शनास आल्यास अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांशी संपर्क साधावा. समाज माध्यमाचा गैरवापर करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल. 

                         – हर्षवर्धन बी. जे.

          उपविभागीय पोलिस अधिकारी, पुसद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close