आचारसंहिता लागू असतांनाही राजकीय पक्षाच्या उमेदवाराचे बेकायदेशीरपणे शासकीय जागेवर होर्डिंग,पोस्टर,बॅनर्स; निवडणूक विभागाचे मात्र दुर्लक्ष!

पुसद: विधानसभा मतदारसंघात निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असून आचारसंहिता लागू आहे. तरीही विविध राजकीय पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरांत नगर परिषदेच्या हद्दीत नगरपरिषद प्रशासन किंवा संबंधित विभागाचे कोणतेही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीररित्या मोठमोठे होर्डिंग, बॅनर, फ्लेक्सबाजी, नियमबाह्य पद्धतीने करण्यात येत आली असून या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र या प्रकरणाकडे निवडणूक विभाग जाणवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, सध्या राज्यभरासह पुसद विधानसभा मतदारसंघातही सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू असून आदर्श आचारसंहिता लागू आहे ही आदर्श आचारसंहिता पाळणे हे सर्व राजकीय पक्षांचे व उमेदवारांचे आणि सरकारसाठीही बंधनकारक आहे. मात्र या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी किंवा उमेदवाराने या आदर्श आचारसंहिता नियमाचं उल्लंघन केल्यास निवडणूक आयोग कारवाई करू शकतो. पण पुसद विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहिता नियमाचं उल्लंघन केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आदर्श आचारसंहिते दरम्यान राजकीय पक्ष उमेदवारांनी निवडणूक प्रचार सभा तसंच मिरवणुकाचे नियोजन बॅनरबाजी, पोस्टरबाजी, फ्लेक्सबाजी कसं करावं त्यासाठी काही नियम आखले आहे. या मतदारसंघात ही निवडणूक आखरी टप्प्यात आली असून निवडणुकीच्या प्रचाराला वेग ही आला आहे उद्या निवडणुकीचा प्रचार बंद होणार आहे.उमेदवारासमोर गर्दीतून उभे राहणे आणि ओळखता येण्यासारखे आवाहन आहे शहरात राजकीय नेत्यांची नावे आणि छायाचित्र असलेले डझनभर बेकायदेशीर होर्डिंग, बॅनर,फ्लेक्स, बेकायदेशीररित्या रस्त्याच्या दुभाजकावर, फूटपाथवर, विद्युीविभागाच्या लोखंडी खांबावर, शासकीय भिंतीवर विनापरवाना लावण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र मालमत्तेच्या वीधरुपणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९८५ नुसार सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी पोस्ट लावण्यास परवानगी नाही तरीही या उमेदवारांनी जाणीवपूर्वक नगरपरिषद प्रशासनाची किंवा संबंधित विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बॅनरबाजी फ्लेक्स बाजी पोस्टरबाजी करून आपला प्रचार जोरात सुरू ठेवला आहे. परंतु याकडे निवडणूक विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या मोठमोठे होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स, नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आल्याने सर्वसामान्यांसाठी एक नियम व राजकारणासाठी अलग नियम आहे कां.? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे. या निवडणुकीत उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.तर या नियमबाह्य बॅनर, होल्डिंग, फ्लेक्स, पोस्टरबाजी संदर्भात आम्ही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे स्पष्ट केले की नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या वतीने अशी आम्ही कोणतीही या फ्लेक्स बाजी बॅनरबाजीला परवानगी दिली नाही. तर दुसरीकडे बस स्थानकावर लावण्यात आलेली होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर, पोस्टर, हे संबंधित महामंडळाच्या व्यवस्थापकाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याने व्यवस्थापकाने तशी माहिती संबंधित पोलीस विभागाला दिली असून हे होर्डिंग पोस्टर बॅनर काढून टाकण्याची मागणी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे परंतु पोलीस विभागाने सुद्धा यावर कुठलीही कारवाई केली नसल्याची माहिती शाखा व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी दिली आहे. पण आदर्श आचारसंहिता काळात बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या या राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या प्रचार फलकावर होर्रडिंग , बॅनर, फ्लेक्सबाजी पोस्टरवर संबंधित निवडणूक विभाग काय.? कारवाई करणार की संबंधितावर गुन्हे दाखल करणार हे मात्र नागरिकांमध्ये उत्सुकतेचा विषय बनला आहे.



