मतत्रयोदशी ! ‘शुभ’ मुहूर्त साधत अखेरच्या दिवशी दिग्गजांनी शक्तीप्रदर्शन करीत भरले उमेदवारांचीअर्ज!

पुसद: विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी अखेरचा दिवसपर्यंत २९ उमेदवारांनी आपले नामनिर्देशित पत्र दाखल केले.धनत्रयोदशीचा ‘शुभ मुहूर्त’ साधत पुसद विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी अनेक दिग्गजांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपापले उमेदवारी अर्ज दाखल करत खऱ्या अर्थाने ‘मतत्रयोदशी’ साजरी केली.अनेक दिग्गजांनी शक्तीप्रदर्शन करीत आपापले झेंडे फडकवत निघालेल्या उमेदवारांच्या मिरवणुकांमुळे पुसद विधानसभा मतदारसंघातील परीसरात निवडणुकीचे वातावरण गरम असल्याचे चित्र आहे.तर पुसदच्या प्रस्थापित नाईक कुटुंबात थ्रीपॉईंट कल्होळ पाहावयास मिळत आहे.येत्या २० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या पुसद विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकूण २९ उमेदवारांनी आपले नामनिर्देशित पत्र दाखल केले आहे. यामध्ये महायुतीच्या सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा ॲड.इंद्रनिल मनोहरराव नाईक यांना उमेदवारी दिली आहे.तर पुसद विधानसभा मतदारसंघात ही लढाई परिवर्तनाची, रखडलेल्या विकासाची, येणाऱ्या पाच वर्षात संधीचं सोनं करणार आल्याच सांगत यांनी महाविकास आघाडीच्या शरद अप्पाराव मैंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.महविकास आघाडीचे बंडखोर युवानेते ययाती मनोहरराव नाईक यांना तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माधवराव वैद्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मधुकर राजु राठोड (अपक्ष), माजीद अहेमद सलाम अहेमद (अपक्ष), अर्जुनकुमार सिताराम राठोड (अपक्ष व पक्ष), अनिल दत्तराव शिंदे (अपक्ष), सुश्रुत मारोतराव चक्करवार (अपक्ष), किसन रामराव अंबुरे (अपक्ष), गोपालकृष्ण बाबुसिंग जाधव (अपक्ष), मधुकर तुकाराम राठोड (अपक्ष), शेख नौशाद शेख सुलतान (अपक्ष), अलीयार खान (अपक्ष), शेख जब्बार शेख युसुफ (अपक्ष), देविदास सोमला पवार (अपक्ष), विशाल बळीराम जाधव (अपक्ष), वजाहत अली खान मोहम्मद अली खान (एमआयएम), अश्विन रमेशलालजी जयस्वाल (मनसे),शरद यशवंत भगत (बहुजन समाज – पक्ष), मनिष सुभाषराव जाधव – (स्वाभिमानी शेतकरी संघटना), नथ्थू – दाऊ आगलावे (अपक्ष), शरद विठ्ठल – जाधव (अपक्ष), अनिस अहेमद सलीम अहेमद (अपक्ष), राजु नथ्थूजी – दुधे (अपक्ष), मारोती किसनराव भस्मे (भीम आर्मी) व विक्की उबाळे (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि सोमवार,४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. आता अधिकृत उमेदवारांपुढे पक्षातील बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल हे कामकाज पाहत आहेत तर सहाय्यक म्हणुन तहसिलदार महादेव जोरवर हे कामकाज पाहत आहेत.




