क्राइम

बचतगटाच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक, फायनान्स कंपनीविरुद्ध तक्रार दाखल!

पुसद: तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे महिलांना बचत गटाच्या नावावर एका महिलेसह तिच्या पतीने फायनान्स कंपनीने संगणमत करून परिसरातील महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून पैशाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयाने फसवणूक करणा-या खाजगी फायनान्स कंपनीविरोधात शेकडो महिलानी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार चौकशीत ठेवण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत प्राप्त माहिती अशी की पुसद तालुक्यातील शेबांळपिंपरी येथे एका महिलेसह तिच्या पतीने एका खाजगी फायनान्स कंपनीने संगणमत करून परिसरातील महिलांचे बचत गट तयार केले.या गटाच्या महिलांना लाखोचे वाटपही केले. सदर महिलांनी कर्जवसुलीची रक्कम त्या महिलेच्या पतीकडे जमा केली. मात्र, ३० ऑगस्ट रोजी हे पती-पत्नी या महिलांची फसवणूक करून दोघेही गावातून फरार झाले त्यावेळी आपली फसवणूक झाल्याची या महिलांना लक्षात येताच त्यांनी तात्काळ न्यायासाठी प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. अशा अनेक खासगी फायनान्स कंपनीने पुसद तालुक्यातील ग्रामीण भागात इतरत्र महिला बचत गट उघडण्याची मोहीम सुरू केली होती. त्यामध्ये शेंबाळपिंपरी येथील एका कुटुंबाने पुढाकार घेऊन परिसरातील अनेक गावात जाऊन महिलांचे बचत गट तयार केले. सलमा बेगम उर्फ पिंकी व तिचा पती शेख मुजाहिद शेख वहीद असे फसवणूक करणाऱ्या या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना लाखोचे कर्ज फायनान्स कंपनीने वाटले. त्यानुसार महिलांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम भरण्याची हमीही दिली होती.जवळपास या परिसरात १६ फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींचे कर्जवाटप झाले आहे. या कंपन्यांनी बचत गटावर नियंत्रण ठेवण्यासाठी सलमा बेगम यांना अध्यक्ष केले. त्यांच्या सहकाऱ्यांनेच या महिलांना कर्जवाटप झाले होते. त्यामुळे महिला कर्जाची रक्कम परतफेड करताना या महिलेसह तिच्या पतीकडे जमा करायच्या. मात्र, अचानकपणे ३० ऑगस्टच्या मध्यरात्री दोघेही पती-पत्नीने गावातून पलायन केल्याने ही घटना उघड झाली त्यानंतर संबंधित बचत गटाच्या महिला अडचणीत आल्या त्यातूनच या प्रकरणाची तक्रार उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आली. तक्रारीच्या प्रतिलिपी यवतमाळचे खा. संजय देशमुख, गृहमंत्री आ. इंद्रनील नाईक यांच्याकडे पाठविण्यात आल्या त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close