शैक्षणिक
डॉ.अनुश्री अनिल पुरी यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल यांचा श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयात, शिक्षक दिनी सत्कार

पुसद : येथील श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद येथे प्र.समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ अनुश्री अनिल पुरी यांनी नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांच्या कडून डॉक्टरेट (Ph.D) प्राप्त केल्यामुळे त्यांचा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया कोकाटे मॅडम यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ छाया कोकाटे,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.पल्लवी राठोड,डॉ.प्रा.स्वप्ना देशमुख, प्रा.विक्रांत मेश्राम,प्रा.डॉ.अमित सुरजुसे, प्रा.आशालता बरडे,प्रा. वर्षा गारुळे,प्रा.दिप्ती कुबडे, व सर्व शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित होते.तसेच त्यांना वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कडून सरकार व शुभेछा देऊन पुढील भविष्यासाठी शुभेछा देण्यास आल्या.



