माऊंट लिटरा झी स्कूल पुसदच्या वतीने आयोजित गुडलक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पुसद :येथील माऊंट लिटरा झी स्कूलच्या वतीने पॅरीस येथे सुरू होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी दि.२५ जुलै २०२४ रोजी विद्यार्थ्यांची गुडलक रॅली काढण्यात आली.
सदर रॅली शाळेचे अध्यक्ष विक्रम गट्टाणी, उपाध्यक्ष अमर आसेगावकर, सचिव संदिप जिल्हेवार, कोषाध्यक्ष रवी गट्टाणी, संचालक भागवत चिद्दरवार, क्रिडा शिक्षक सुशील दिक्षीत यांच्या मार्गदर्शनाखाली काढली होती.
या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आले . त्यानंतर स्कूल कॅप्टन तन्वी गट्टाणी, अक्षरा चिद्दरवार यांनी मशाल पेटवून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.
पुसद चे युवा नेतृत्व ययाती भाऊ नाईक ,मार्गदर्शक श्री दीपक भाऊ आसेगावकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे आदरणीय उत्तमराव रुद्रवार सर, मा .आशिष भाऊ देशमुख, सामाजिक कार्यकर्ते निशांत बयास, अशोक बाबर, विरेंद्र राजे,वैभव फूके यांची उपस्थिती होती .पुसद तालुका शारीरिक शिक्षक संघटना पुसद ,विश्वनाथ सिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था पुसद ,सराफ – सुवर्णकार संघटना पुसद ,कापड लाईन पुसद ,तालीम कुस्तीगीर असोसिएशन पुसद ,चेतना क्रीडा मंडळ पुसद ,आझाद विशाल मित्र मंडळ पुसद ,पोलीस बॉईज संघटना जिल्हा यवतमाळ ,एडवोकेट विरेंद्र जगजीवन राजे, श्रद्धा बुक स्टॉल श्रीरामपूर पुसद,आर एस स्पोर्ट क्लब पुसद ,शंकर धुळे ग्रुप पुसद या सर्व सामाजिक संघटनांनी रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत करून चॉकलेट व बिस्किट दिले.रॅलीच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले . अशा प्रकारची रॅली पुसद मध्ये पहिल्यांदाच झाली असून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व ऑलम्पिक मध्ये जास्तीत जास्त खेळामध्ये सहभागी होऊन यशस्वी होऊन मेडल जिंकण्यासाठी शुभेच्छा देण्यातआल्या .विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू प्रवृत्ती वाढून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाप्रती आकर्षण निर्माण व्हावे या दृष्टीने या रॅलीचे आयोजित करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये पोलीस प्रशासन व जिल्हा क्रिडा अधीकारी आॅफीस, यवतमाळ जिल्हा फुटबॉल संघटना यांचे विशेष सहकार्य लाभले, शाळेचे व्यवस्थापन समितीतील सदस्य, मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , क्रीडा प्रशिक्षक ,पालक व सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून रॅली यशस्वी केली.



