माऊंट लिटरा झी स्कूल मध्येआषाढी एकादशी उत्सव साजरा!

पुसद: येथील माऊंट लिटरा झी स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला .आषाढी एकादशी हा सण भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे .विद्यार्थ्यांना या संस्कृतीचे महत्त्व व वारकरी संप्रदायाची शिकवण कळावे हा दूरदृष्टीकोण ठेवून संस्थेचे अध्यक्ष मा.विक्रमजी गट्टाणी,उपाध्यक्ष मा. अमरजी आसेगावकर ,सचिव मा.संदीपजी जिल्हेवार ,कोषाध्यक्ष मा.रविजी गट्टाणी,संचालक मा.भागवतजी चिदरवार व सर्व संचालक मंडळांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आले.
विद्यार्थ्यांची दिंडी शाळा ते आप्पास्वामी मंदिरापर्यंत काढण्यात आले. सदर दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान केले.विठ्ठल नामाने व भजन कीर्तनांनी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला .त्यानंतर शाळेत कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले .कार्यक्रमाच्या सुरुवातीला भक्ती गीताचे गायन करण्यात आले .त्या गीतात स्वरा गवई( वर्ग पाचवा )शिवांश राजे (वर्ग तिसरा), विराज पाठक( वर्ग तिसरा )अभिराज साखरे (वर्ग तिसरा) स्वरित ठेंगे (वर्ग तिसरा) या विद्यार्थ्यांचा सहभाग होता .त्यानंतर माऊली माऊली या गीतावर उत्कृष्ट असे नृत्य सादर करण्यात आले .या नृत्यात आरोही चव्हाण, हिरांशा जैस्वाल ,श्रावणी मुराडी, विधी सोनवणे ,जीनल सुखवानी, सिद्धी चव्हाण,श्रीषा राजुरकर ,निधी राठोड ,अनन्या सिरसकर ,अभिज्ञा भडंगे ,अनन्या कांबळे, तृप्ती मार्कंडे ,गार्गी सोनटक्के या विद्यार्थिनींचा सहभाग होता .वारकरी संप्रदाय व त्या संप्रदायातील संतांचे कार्य या विषयावर रिया कदम( वर्ग सहावा) अनुष्का फुके (वर्ग चौथा) अरल कुबडे ( वर्ग दुसरा) साक्षी शिंदे (वर्ग सातवा ) या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले .सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री नरेंद्र सिंग चाैहान,शाळेचे समन्वयक श्री सुशील दीक्षित ,प्रशासन अधिकारी श्री धनंजय निखार ,संगीत शिक्षक श्री ओम प्रकाश गवई,श्री अमोल भालेराव,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंजनी आडे तर आभार रिद्धी राठोड या विद्यार्थिनींने मानले .



