Uncategorized

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नविन एनडीए सरकारच्या मंत्र्यांना दिला शपथविधी;नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान!

दिल्ली/ वृत्तसेवा: देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात एनडीए सरकारच्या ७२मंत्र्यांना शपथ दिली.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अतिशय धक्कादायक निकाल लागले आहेत. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला बहुमताचा आकडाही पार करता आला नाही, पण एनडीएला २९०+ जागा मिळाल्या आहेत त्यामुळे जवळपास ४३पक्षांना सोबत घेऊन एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहेत. त्यांच्यासोबत आणखी ७१ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यापैकी ३० जणांनी कॅबिनेट मंत्री, ५जणांनी स्वतंत्र प्रभार आणि ३६जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. गेल्या दोन टर्ममध्ये पूर्ण बहुमताने सरकारचे नेतृत्व करणारे मोदी यावेळी आघाडी सरकारचे नेतृत्व करत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मित्रपक्षांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मागील सरकारमध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवांवरही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात समाविष्ट चेहरे-  १- राजनाथ सिंह, भाजप, यूपी २- अमित शहा, भाजप, गुजरात३- नितीन गडकरी, भाजप, महाराष्ट्र४- जेपी नड्डा, भाजप, हिमाचल प्रदेश५- निर्मला सीतारामन, भाजप, कर्नाटक६- एस जयशंकर, भाजप, गुजरात७- शिवराज सिंह चौहान, भाजप, मध्य प्रदेश८- पियुष गोयल, भाजप, महाराष्ट्र९- धर्मेंद्र प्रधान, भाजप, ओडिशा१०- एचडी कुमारस्वामी, जेडीएस, कर्नाटक ११- मनोहर लाल खट्टर, भाजप, हरियाणा १२- जितन राम मांझी, HAM, बिहार १३- ललन सिंग, जेडीयू, बिहार१४- सर्बानंद सोनेवाल, भाजप, आसाम१५- डॉ. वीरेंद्र कुमार, भाजप, आसाम१६- राममोहन नायडू, टीडीपी, आंध्र प्रदेश१७- प्रल्हाद जोशी, भाजप, कर्नाटक१८- जुआल ओराव, भाजपा, ओडिशा१९- गिरीराज सिंह, भाजप, बिहार२०- अश्विनी वैष्णव, भाजप ओडिशा२१- ज्योतिरादित्य सिंधिया, भाजप, मध्य प्रदेश२२- भूपेंद्र यादव, भाजप, राजस्थान२३- गजेंद्रसिंह शेखावत, भाजप, राजस्थान२४- अन्नपूर्णा देवी, भाजप, झारखंड२५- किरेन रिजिजू, भाजप, अरुणाचल प्रदेश२६- हरदीप सिंग पुरी, भाजप, यूपी२७- डॉ.मनसुख मांडविया, भाजप, गुजरात२८- जी किशन रेड्डी, भाजप, तेलंगणा२९- चिराग पासवान, एलजेपी आरव्ही, बिहार३०- सीआर पाटील, भाजप, गुजरात३१- राव इंद्रजित सिंग, भाजप, हरियाणा३२- जितेंद्र सिंह, भाजप, जम्मू३३- अर्जुन राम मेघवाल, भाजप, राजस्थान३४- प्रतापराव जाधव, शिवसेना, महाराष्ट्र३५- जयंत चौधरी, आरएलडी, यूपी३६- जितिन प्रसाद, भाजप, यूपी३७- श्रीपाद यशो नाईक, भाजप, गोवा३८- पंकज चौधरी, भाजप, यूपी३९- नित्यानंद राय, भाजप, बिहार४०- अनुप्रिया पटेल, भाजप, उत्तर प्रदेश४१- व्ही सोमन्ना, भाजप, कर्नाटक४२- डॉ चंद्रशेखर पेम्मासानी, टीडीपी, आंध्र प्रदेश४३- एसपी सिंह बघेल, भाजप, उत्तर प्रदेश४४- शोभा करंदलाजे, भाजप, कर्नाटक४५- कीर्तिवर्धन सिंग, भाजप, उत्तर प्रदेश४७- बनवारीलाल वर्मा, भाजप, उत्तर प्रदेश४७- शंतनू ठाकूर, भाजप, पश्चिम बंगाल४८- सुरेश गोपी, भाजप, केरळ४९- एल मुरुगन, भाजप, तामिळनाडू५०- अजय टमटा, भाजप, उत्तराखंड५१- बंडी संजय कुमार, भाजप, तेलंगणा५२- कमलेश पासवान, भाजप, उत्तर प्रदेश५३- भगीरथ चौधरी, भाजप, राजस्थान५४- सतीशचंद्र दुबे, भाजप, बिहार५५- संजय सेठ, भाजप, झारखंड५६- रवनीतसिंग बिट्टू, भाजप, पंजाब५७- दुर्गा दास (डीडी) उईके, भाजप, मध्य प्रदेश५८- रक्षा निखिल खडसे, भाजप, महाराष्ट्र५९- सुकांता मजुमदार, भाजप, पश्चिम बंगाल६०- सावित्री ठाकूर, भाजप, मध्य प्रदेश६१- टोखान साहू, भाजपा, छत्तीसगड६२- राजभूषण चौधरी, भाजप बिहार६३- भूपती राजू श्रीनिवास वर्मा, भाजप, आंध्र प्रदेश६४- हर्ष मल्होत्रा, भाजप, दिल्ली६५- नीमुबेन बांभनिया, भाजप, गुजरात६६- मुरलीधर मोहोळ, भाजप, महाराष्ट्र६७- जॉर्ज कुरियन, भाजप, केरळ६८- पवित्रा मार्गेरिटा, भाजप, आसाम६९- कृष्णपाल गुर्जर, भाजप, हरियाणा७०- रामदास आठवले, आरपीआय (ए), महाराष्ट्र७१- रामनाथ ठाकूर, जेडीयू, बिहार

मोदींनी गुजरातमध्ये २००२, २००७ आणि २०१२ मध्ये पक्षाचे नेतृत्व केले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी आपल्या पक्षाला केंद्रात विजय मिळवून देण्यात आणि सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्याने यावेळी भाजपचा विजय वेगळा आहे.

पहिल्यांदाच मोदींना तीव्र विरोध..

२०१४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मोदींना आता प्रखर विरोधाचा सामना करावा लागत आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपला झालेल्या निवडणुकीतील नुकसानावरही टीकाकारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशातील भाजपच्या खराब कामगिरीची सर्वाधिक चर्चा होत आहे. लोकसभेत सर्वाधिक ८० खासदार पाठवणाऱ्या या राज्यात सपा-काँग्रेस आघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला मागे टाकले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close