पुसद येथील श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाची बारावीच्या निकालाची उज्वल परंपरा कायम;मुलींची बाजी!विज्ञान शाखा-८९.५५%कला शाखा-८०.८०%

पुसद: येथील श्री शिवाजी उच्चमाध्यमिक विद्यालयाने नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालाची उज्वल परंपरा या वर्षी सुद्धा कायम राखली असून विज्ञान शाखा ८९.५५ % तर कला शाखा ८०.८०% लागला असून कनिष्ठ महाविद्यालयातून कला शाखामधून वैष्णवी गजानन कळसाईत७३.५०%प्रथम ,खुशी संजय चव्हाण ७०.५०% द्वितीय, समिक्षा उत्तम गडदे ६७.६७% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेआहेत. विज्ञान शाखेतून भाग्यश्री बाळासाहेब कदम ७४% प्रथम, नेहा अनिल राठोड ६७.६७% द्वितीय ,अनामिका आनंदा जाधव ६०.१७ %तृतीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे सर्व्वेसर्वा अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर तसेच संस्थेच्या सचिव अश्विनीताई पाटील चोंढीकर यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर मुख्याध्यापक विजय उंचेकर पर्यवेक्षक रामचंद्र हिरवे यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



