ईतर

ग्राम वाचनालय, गणेशपूरची नवीन कार्यकारिणी गठीत!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : येथील छोरिया लेआऊट स्थित ग्राम वाचनालय, गणेशपूरची सात सदस्यांची नवीन कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. या कार्यकारणीत अध्यक्षपदी रामदासजी बोढे, उपाध्यक्षपदी संदीप ठाकरे, सचिवपदी संदीप डहाके, सहसचिवपदी प्रवीण ठेंगणे, कोषाध्यक्षपदी जगदिशजी ठावरी, सदस्य गणेश लोहे आणि पलाश बोढे यांची निवड उपस्थित आजीवन सदस्यांमधून लोकशाही पद्धतीने सर्वानुमते करण्यात आली. वाचनालयाची ही कार्यकारिणी 2023 ते 2028 या कालावधी करिता असून या निवडीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माजी नायब तहसीलदार रामरावजी गोहोकार यांनी जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी वाचनालयाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सदर ग्राम वाचनालय, छोरिया लेआऊट मध्ये विनायक मंगल कार्यालयाच्या मागे असून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाचे साक्षीदार ठरत आहे. वाचनालयात अभ्यासाकरिता मुबलक पुस्तके, सुयोग्य बैठक व्यवस्था,वायफाय सुविधा, थंड व शुद्ध (RO)जल, सी.सी.टी. व्ही. कॅमेरा, प्रशस्त हिरवळ युक्त अंगण आणि रंगी बेरंगी फुलांनी नटलेली झाडी असा अभ्यासासाठी पोषक परिसर आहे. ग्राम वाचनालयाचा परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष रामदासजी बोढे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close