सामाजिक

विश्वास भवरे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित !

पुसद :येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विश्वास भवरे यांना दि.१२ मार्च२०२४ रोजी मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मींग आर्टस,( NCPA) जमशेद भाभा नाट्यगृहात पारपडलेल्या महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण २०२२-२३ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.पुसद शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसरअसलेले तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हासरचिटणीस विश्वास भवरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने पुरस्काराकरिता त्यांच्या नावाची निवड केली होती.त्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव शासनाने विश्वास भवरे यांची निवड करून त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने भारतीय जनता पक्ष पुसदच्या व शहरातील नेत्यांनी व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close