सामाजिक

मृत्युला आमंत्रण देणाऱ्या महागाव पूलावरील खंड्ड्याला अखेर सामाजीक कार्यकर्त्यांनी बुझविले :एनएचआय मात्र झोपेतच!

महागांव/प्रतिनिधी (संदीप कदम): महागाव येथील पुस नदीच्या पुलावर मागील कित्येक दिवसापासून खंड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे मोठा अपघात घडून जिवीत हानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती पुलावरून पाणी वाहून जाण्यासाठी आऊटलेट नाहीत. कालबाह्य आऊटलेट मध्ये कचरा व गाळ साचला आहे. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा पावसाळ्यात हजर राहत असे, मात्र नागपूर ते तुळजापुर राष्ट्रीय महामार्ग ३६१चे काम सुरु झाल्यापासुन या पुलाकडे संबंधीत यंत्रनेचे प्रचंड दूर्लक्ष आहे. त्या पडलेल्या खंड्ड्यांमध्ये रोज छोटे – मोठे अपघात घडत आहे.

मागील चार दिवसापूर्वी त्या पुलावरील खंड्ड्यामध्ये कंटेनर (ट्रक) अपघातग्रस्त होवून बंद पडला होता. त्यामुळे या हायवेवरील वाहतूक १० तास बंद होतीअंबोड्यापासून ते मुडाण्यापर्यंत ट्रकाच्या रांगा लागल्या होत्या प्रशासनाची तारांबळ उडाली होती. अनेक प्रयत्नानंतर अपघात ग्रस्त केटनर (ट्रक) बाहेर काडून वाहतुन सुरु करण्यात आली होती. तरीपण ४ ते ५ दिवस ओलांडूनही सुद्धा संबंधीतांना जाग आली नाही. तो अपघातग्रस्त खंड्डे अद्यापही बुझवीण्यात आले नाही.

परंतु हा गंभीर विषय लक्षात घेवून सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असणारे वैद्यकीय क्षेत्रातील देवदुत माणुस सामाजिक कार्यकर्ते भावीक भगत व त्यांच्या कार्यकर्तांनी तो पुलावरील पडलेले खड्डे तात्काळ बुझवीले. भावीक भगत हे स्वःता नदीपात्रात उतरले नदीपात्रातून रेती, दुकानातून गिट्टी, सीमेंट सर्व साहित्य स्वःखर्चाने आणुन पुलावरील खड्डे बुझवीले. त्यावेळेस विष्णु चौधरी, अनुप शेखावत, सुदाम कवाने, प्रमोद भोयर, प्रेमानंद पांचाळ, गोवींदराव देशमुख, मनोज गोरे, सह अन्य नागरीक व पदाधीकाऱ्यांनी श्रम घेतले. त्यांच्या या केलेल्या कामाचे सर्व नागरीकांकडून कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close