ईतर
जिवंत विद्युत तारेचा करंट लागून एका इसमाचा मृत्यू!

वणी/प्रतिनिधी ( शुभम कडू ) : मेंढोली येथील सुनिल ढवस यांची वरझडी शिवारात शेतजमीन असुन ते ट्रक्टर व लाईन दुरुस्तीचे खाजगीत काम करत होते. बुधवारी दि. १२ जुलै ला सायं. ६:३० वाजताच्या सुमारास संजय जिवतोडे यांचे शेतातील विद्युतवर चढून ते लाईनचे काम करित असताना जिवंत विद्युत तारेचा करंट लागल्याने खाली कोसळले अशातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी संजय जिवतोडे यांच्या शेताकडे धाव घेतली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.



