माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन च्या वतीने गरजुना अन्नदान व फळे वाटप!

पुसद: येथे माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन च्यावतीने उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त व हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
तसेच रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना
व तेथील गरजूंना पोळी भात भाजी जिलेबीचे जेवण व फळे वाटप करून कृषी दिन व मा वसंतरावजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात केली, रुसलेल्या निसर्गाच्या चरणी प्रार्थना केली की, आता तुझा रुसवा दूर करून एवढा पाऊस पडू दे की माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे आणि माझा बळीराजा आनंदी व्हावा, देशाचा पोशिंदा जगला पाहिजे अशी मनोकामना केली.महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या महानायकास कोटी कोटी प्रणाम,उपस्थित मान्यवर सुनील भाऊ टाक, मनीषभाऊ शहा,संजयभाऊ पवार,कैलास डांगोरिया,गणेश डांगोरिया,राज डागर,चंद्रकांत डागर,भारत डागर,रिंकू वाजा,श्री पुंजाराम मस्के,श्रीमती निर्मलाबाई मस्के,धनश्री मस्के,श्रेयश्री मस्के,सुनील ठाकरेसर, विलासराव भागवतसर,व माणुसकीची भिंत मार्गदर्शक व शिवप्रभा ट्रस्ट पुणे उपाध्यक्ष परशराम नरवाडे सर माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव सचिव सोहम नरवाडे शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव माणुसकीच्या भिंतीचे सदस्य अनंताभाऊ चतुर,पंजाब ढेकळे,अरुण नागुलकर,धनंजय आघाम,दीपक घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.



