क्राइम

जिवघेण्या हल्ल्यातील व अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन छेळणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन केले गजाआड; पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद: ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दि २७ ऑगस्ट २०२६ रोजी फीर्यादी सुरजितसिंग हरबन्ससिंग भाटीया, वय ५० वर्ष, रा. श्रीरामपुर, पुसद यांनी तक्रार दिली की, सुखविंदरसिंग उर्फ सोमी जसबिरसिंग भाटीया वय २४ वर्ष रा. विवेकांनद सोसायटी, श्रीरामपुर पुसद यास आरोपी नामे विकास वाळके, दिलीप शेंबडे, भारत गावंडे या तिघांनी दिनांक २७ऑगस्ट२०२६ रोजी वेळ अं १९.०० वा ते १९.३० वा. दरम्यान पकडुन भारत गावंडे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने विळाने वार करुन गंभीर जखमी केले. त्यावरून आरोपीविरुध्द गुन्हा नंबर ५५६/२०२६ कलम १०९ (१),११५(२), ३५२,३(५), भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील जखमी नामे सुखविंदरसिंग उर्फ सोमी जसबिरसिंग भाटीया यांचेवर शासकीय रुग्णालय, यवतमाळ येथे उपचार सुरु आहे.तसेच फिर्यादी, वय ४२ वर्ष, रा. मोरथ वाकोडी ता. महागाव यांनी तक्रार दिली की, त्यांची अल्पवयीन मुलगी इयता ९ वी मध्ये शिक्षण घेत असुन आरोपी नामे संदीप रामेश्वर कदम वय ३० वर्ष, रा. कवडीपुर पुसद हा तिचा मागिल काही दिवसापासून पाठलाग करुन छळ करीत आहे अशा तक्रारवरुन नमुद आरोपी याचेविरूध्द दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून गुन्हां रजी. नं.५५७/२०२६ कलम ७४,७८ भा.न्या.सं.सहक.८.१२ बालकांचे लैगींक अपराधापासून सरंक्षण अधि. अन्वये नोंद करण्यात आला होता.

सदर दोन्ही गुन्हांचेगांभीर्य ओळखून मा. पोलिस अधिक्षक साहेब, यवतमाळ यांनी आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेशीत केल्याने पथके तयार करून रवाना करण्यात आले होते.सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून तात्काळ गून्हांचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षण करून गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असतांना गोपनिय बातमीदार यांच्याकडून माहीती मिळाली की, गुन्हयातील आरोपी कवडीपुर शिवारात व यवतमाळ येथ े वावर करीत असल्याचे माहीती मिळाल्याने, तात्काळ सदर ठीकाणी जावून आरोपी नामे ०१. भारत अनंता गावंडे वय ३२ वर्ष, रा. जवाहरनगर, श्रीरामपुर, पुसद, ०२. विकास उत्तम वाळके वय ३० वर्ष, रा. मोरथ ता. सांडवा, ता. पुसद, ०३. दिलीप गणेश शेंबडे वय १९ वर्ष, रा. मोरथ, ता. महागाव, ०४. अनंता कान्होजी गावंडे वय ६० वर्ष, रा. जवाहननगर, श्रीरामपुर, पुसद यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता नेहमी शेताकडे येण्याचे कारणावरून वाद झाल्याने जख्मीस विळा मारल्याचे सांगून गुन्हा कबूल केल्याने त्यांना अटक करण्यात आली. तसेच संदीप रामेश्वर कदम वय ३० वर्ष, रा. बजरंगनगर, कवडीपुर, पुसद यास यवतमाळ येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली असून दोन्ही गुन्हांचा अधिक तपास सूरू आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता सा.मा. अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशोक थोरात सा., यांचे मार्गदर्शनात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद अमर मोहीते सा., सतिश चवरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे नेतृत्वात ठाणेदार आशिष चौधरी, पोउपनि राहूल देशमूख, पोउपनि कैलास ससाणे, सफी मसूद शेख, पोहेका रविंद्र गावंडे, पोअ / अक्षय मोटे, योगेश आळणे, मो. ताज, पो. स्टे. पुसद ग्रामिण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close