प्रवासी वाहतूक करणाऱ्या मालवाहू ॲपेच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू तर ९जण गंभीर जखमी; नवस फेडण्यासाठी जात असतानाची बेलगव्हाण घाटातील घटना!

पुसद:ते दिग्रस रस्त्यावरील बेलगव्हाण घाटात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मालवाहू ॲपेच्या पुलावरून कोसळुन भीषण अपघात घडला असुन या अपघातात ४ जण जागीच ठार झाले असून उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन चिमुकल्यांना नांदेड येथे उपचाराकरिता रेफर करण्यात आले असून त्यांची सुध्दा प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१६ जानेवारी २०२४ रोजीच्या सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास या अपघातातील काही मंडळी दरवर्षीप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील उमरीच्या देवीला नवस फेडण्यासाठी बकरे घेऊन मालवाहू ॲपे क्रमांक एम.एच.२९,३२७२ या वाहानात क्षमतेपेक्षा जास्त नियमबाह्य पद्धतीने जवळपास १२ ते १३ लोक बसविले होते. यामध्ये धुंदी,सिंगरवाडी व जवाहर नगर येथील नातेवाईकांचा समावेश होता.मालवाहू ॲपे ऑटोरिक्षा प्रवासी वाहतूकीसाठी वापर करण्यात आला असून पुसद ते दिग्रस रस्त्यावरील बेलगाव्हाणच्या भरधाव वेगाने जात असतांना ऑटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ऑटो पुलावरून कोसळुन पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला या अपघाताची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.या आपघातात
उषा विष्णू राठोड वय ६० वर्षे रा.जवाहर नगर (धुंदी),ज्योती नागा चव्हाण वय ६० रा.जवाहर नगर (धुंदी), वसराम देवसिंग चव्हाण वर ६५ वर्षे रा. सिंगरवाडी (धानोरा),पार्वती रमेश जाधव वय ५५ वर्षे रा.वसंतपूर या ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर गंभीर जखमीनां पुसद येथील खासगी मेडिकेअर हॉस्पिटल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तेव्हा उपचारादरम्यान लिला वसराम चव्हाण वय ६० वर्षे सिंगरवाडी (धानोरा), सावित्री गणेश राठोड वय ४५ वर्षे रा.जवाहर नगर (धुंदी) या दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला ९जण गंभीर जखमी आहेत.आपघातात अल्पवयीन गंभीर जखमी चिमुकल्यांना नांदेड येथे उपचाराकरिता रेफर केले आहे. परंतु त्यांची सुद्धा चिंताजनक असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे नवसाचा बोकड जीवंत असुन त्याच्या पायाला मार लागला आहे.
मालवाहू ॲपे ऑटो रिक्षात नियमबाह्य पद्धतीने
क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यानेच अपघात घडला!
पुसद शहरांसह तालुक्यात शहरात बेशिस्त वाहतुकीने कळस गाठल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने, ॲटोचालकांच्या मनमानीमुळे सामान्य नागरिक वेठीस धरल्या जात आहे. अनियंत्रित वाहतुकीमुळे मुख्य मार्गांवर अपघात होऊन लोकांचे जीव जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.तरी देखील पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केल्या जात नाही.वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकावर कारवाई करण्याची मागणी जागृत नागरिकाकडून जोर धरत आहे. यात विशेष म्हणजे मालवाहू ऑटो ॲपेमध्ये परवानगी नसताना प्रवासी वाहतूक केल्याने दुर्दैवी अपघात घडला आहे.
कायद्याच्या धाकाने चालकांकडून आत्महत्येचा प्रयत्न
मालवाहू ॲपे ऑटोरिक्षात जवळपास १५ लोक प्रवास करीत होते त्यामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मालवाहू ऑटो पुलावरून कोसळुन पलटी झाल्याने ६ जणांना जिव गमवावा लागला त्यामुळे ऑटो चालक देखील जखमी झाला होता.अशावेळी त्याचा मनावरील ताबा सुटल्याने तो बाजूलाच असलेल्या झाडाला फाशी घेण्याचा प्रयत्न करीत असतांत. घटनास्थळावर नागरिकांनी त्याला पकडून उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
रुग्णालयात जखमीची दोन्ही पक्षांच्या आमदारांनी घेतली भेट
दर्शन संतोष पवार वय ५७ वर्षे रा.शिवा नगर,सोहमनाथ गणेश राठोड रा.जवाहर नगर (धुंदी),निर्मला गणेश राठोड रा.जवाहर नगर (धुंदी),पूजा सागर चव्हाण, गणेश लच्छीराम राठोड रा.जवाहर नगर (धुंदी) वय ६२ वर्षे,आशा फुलसिंग चव्हाण वय ४२ वर्षे रा.जवाहर नगर (धुंदी तांडा) व अनिता सोहमनाथ राठोड रा.जवाहर नगर (धुंदी) असे जखमींची नावे असुन त्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याची माहिती कळताच अपघात ग्रस्तांना भेटण्यासाठी पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक, विधान परिषद सदस्य तथा आमदार ॲड.निलय नाईक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी भेट देऊन नातेवाईकांची सांत्वन केले होते.



