आंदोलन पेटणार, बोरगडीचे ग्रामस्थ आक्रमक; एकोणीस मार्च रोजी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा!

पुसद : शहरांसह तालुक्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले त्यामुळे माणसात माणुसकी हरवत चालली आहे,जमीन,घर,बंगला,गाडी सर्वच जागेवर राहते आणि मोकळ्या हाताने जगाचा निरोप घ्यायचा आहे तरीही लोकं हे माझे ते माझे करत आहेत,अशीच घटना घडली आहे तालुक्यातील मौजा बोरगडी गावठाणला लागुन असलेल्या काही धनदांडग्या शेतकऱ्यांनी सरकारी जमिनीसह स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करून ताबा केल्याने गावांतील ग्रामस्थांना ये-जा करणाऱ्यांसाठी माय-माऊल्या “प्रातःकाळी उठून माय -माऊल्या प्रसाधनगृहास गेल्यास त्यांच्या अंगावर लाईटचा कींवा बॅटरीचा प्रकाश टाकने असे उद्योग सुरू असल्यामुळे या गावांतील ग्रामस्थ वैतागून गेले असुन त्यांना या अतिक्रमण धारकांकडुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्यांनी उपविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून तात्काळ मोका पाहणी करून या अतिक्रमण धारकांचा बंदोबस्त कारावा अन्यथा १९मार्च २०२६ रोजी सामुहिक आत्मदहन करावे लागेल असा प्रशासनाला इशारा दिल्याने हे आंदोलन पेटणार असे संकेत दिसून येत असल्याने चित्र पाहावयास मिळत आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील मौजा बोरगडी येथील जुनी दलित वस्तीतील ग्रामस्थांनी स्थानिक जमीनदारांकडून सरकारी जमिनीवर ताबा करुन अतिक्रमण करून ती बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात शेकडो महिला-पुरुष ग्रामस्थांनी आज एकत्र येत उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन सादर केले.निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, सन १९८२ मध्ये धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तत्कालीन प्रशासनाने शेत सर्वे क्रमांक १ व ३४ दरम्यान बोरगडी जुनी वस्तीचे पुनर्निर्माण केले व आम्हाला तिथे वसविले होते. या ठिकाणी अंदाजे दीड एकर गावठाण, ५६ आर स्मशानभूमी (सर्वे नं. ३५), तसेच सुमारे ६६ फूट रुंदीचा पांदण रस्ता आणि इतर सरकारी जागा मिळून सुमारे चार एकर जमीन आहे.सदर जमीन शहरालगत असल्यामुळे सध्या या जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे गावठाण लगतच्या काही जमीनदारांनी नियोजित पणे अतिक्रमण करून नागरून रस्ते बंद करणे, आया बहिणी सरकारी जागेत संडासला गेल्यास माणसांकडून खुर्ची टाकून लाईट लावून माय माऊलींच्या अंगावर लाईटचा कींवा बॅटरीचा प्रकाश टाकने असे उद्योग सुरू केले आहे.गावाती रस्ता बंद केल्याने गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुल बांधकामांना अडथळे निर्माण करणे, तसेच ग्रामस्थांना मानसिक व सामाजिक त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या त्रासामुळे ग्रामस्थांनी गाव सोडावे आणि जमीन त्यांच्या ताब्यात जावी , असा हेतू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण हटवावे, बंद झालेले रस्ते मोकळे करावेत, गावठाण, गायरान व स्मशानभूमीची जागा स्पष्ट करावी तसेच ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी डिमार्केशन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच घरकुल बांधकामे पुन्हा सुरू होण्यासाठी प्रशासनाने मदत करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, दोन वर्षांपूर्वी या परिसरात याच कारणावरून जातीय तणाव निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता व त्यावेळी गुन्हेही दाखल झाल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यावेळी प्रत्यक्ष जागेची मोजणी झाली होती आता पुन्हा करण्याची गरज असल्यास आम्ही वर्गणी करून पैसे देऊ असे निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाने १९ मार्च २०२६ पर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा नम्रतापूर्वक निर्वाणीचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री, जिल्हाधिकारी यवतमाळ, तहसीलदार पुसद तसेच शहर पोलीस स्टेशन पुसद यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन सादर करताना बोरगडी येथील शेकडो महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.पांदण रस्ते आणि सरकारी जागा मोकळ्या करण्याचा सध्या सरकारचा उपक्रम चालू आहे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.



