क्राइम

यवतमाळ एलसीबीची माेठी कारवाई;उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड आरोपींकडून ३,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त!

यवतमाळ: उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील तिन ते चार महिण्यांपूर्वी येथील भारत फायनांन्सचे कार्यालय असलेल्या आनंद नगर परिसरात बंद घर अज्ञात आरोपींनी फोडुन तेथील लोखंडी तिजोरी चोरुन नेल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीतांविरुध्द अपराध क्रमांक १३०/२०२४ कलम ४५७,३८० भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता व सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. दि. २७जुन२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक उमरखेड उपविभागात अवैध धंदे विषयक कारवाई, अ उघड गुन्हे उघडकीस आणने व पाहिजे फरार असलेले आरोपींचा शोध घेणे संबंधाने उमरखेड परिसरात पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय खबर मिळाली की आनंद नगर परिसरातील घरफोडीची घटना आरोपी शेख निसार शेख उस्मान रा. शिवाजो वार्ड उमरखेड व त्याचे साथीदारांनी केली असून शेख निसार हा उमरखेड बसस्थानका जवळ थांबुन असुन त्याने राखाडी रंगाचे शर्ट परिधान केले आहे. या खबरीवरुन स्थानिक गून्हे शाखेच्या पथकाने प्राप्त माहितीची शहानिशा करणे साठी तात्काळ सदर घटनास्थळी जावुन माहिती प्रमाणे वर्णनाचे इसमाचा शोध घेत असतांना वर्णना प्रमाणे इसम बसस्थानक उमरखेड परिसरात मिळुन आल्याने त्याच त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव १) शेख निसार शेख उस्मान वय ३२ वर्ष, रा. शिवाजी वार्ड उमरखेड असे सांगीतल्याने त्यास आनंद नगर येथील घरफोडी बाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देवुन सदची चोरी त्याचे उमरखेड येथील साथीदार २) आदील खान मेहबुब खान रा. ताजुपरा वार्ड उमरखेड ३) फयाज खान बिस्मीला खान रा. रामरहीम नगर नांदेड रोड उमरखेड ४) अब्दुल कहुस शेख मुज्जीत रा. एम. के. गार्डन रोड, उमरखेड यांचे सोबत मिळुन केल्याचे व तिजोरीतोल पैसे आपआपसात वाटुन घेतल्याचे सांगीतल्याने नमुद सर्व आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या तिन मो.सा. व गुन्ह्यातील रक्कमेतुन खरेदी केलेली बुलेट व मोबाईल असा एकुण ३,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्यात आरोपी क्र. ५) शेख अजहर उर्फ शुट शेख अकवर रा. उमरखेड याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असुन तो सध्या उमरखेड येथील एका गुन्ह्यात न्यायालयीन कोटडीत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चारही आरोपीतांना पुढील कारवाई करीता उमरखेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे. पोलीस अंमलदार कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुभाष जाधव, मोहम्मद ताज, चापोउपनि रेवन जागृत सर्व स्वा.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close