ईतर

समाजाला अंद्धश्रद्धेपासून दुर नेण्याची जबाबदारी रा से यो युवकांची — प्रा. गजानन जाधव 

वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय रा से यो शिबीराला जिल्हा समन्वयकाची भेट!

पुसद:  पारंपरिक थोतांडातून समाजाची मुक्तता करणं आणी त्यांच्यात वैज्ञानिक मुल्य रूजविणे हे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे ध्येय होते. आज समाजात अनेक लोक अंद्धश्रद्धेच्या जोखडात अडकलेले दिसुन येतात.त्यांना अंद्धश्रद्धेपासून दुर नेण्याची जबाबदारी रा से यो युवकाची आहे असे मार्मिक उद्गार रा से यो जिल्हा समन्वयक प्रा गजानन जाधव यांनी काढले. ते वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय पुसद व्दारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष ग्रामीण शिबिर पार्डी येथे सदिच्छा भेटीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.

याप्रसंगी विचारपीठावर प्रा. एन. टी. राठोड, अभिजीत राठोड, रोहन केवटे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज व वसंतराव नाईक यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कु पायल काळे हिने स्वागत गीत सादर केले.त्यानंतर कार्यक्रम अधिकारी प्रा. एस एल राठोड यांच्या हस्ते जिल्हा समन्वयक प्रा गजानन जाधव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आज ज्यांची पुण्यतीथी आहे ते गाडगे महाराज आपले आदर्श असले पाहीजेत. संत कबीर, भगवान गौतम बुद्ध, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, जोतिराव फुले या भूमीवर जन्माले आले व त्यांनी जनसामान्याचे जीवन उजळून टाकले आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या वाट्याला आलेले काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने केले पाहीजेत. तरच सर्वांगसुंदर समाज निर्माण होईल.शिबीरात राबवित असलेल्या विविध लोकोपयोगी कार्यक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व उर्वरित शिबीराला शूभेच्छा दिल्या. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस एल राठोड यांनी सूत्रसंचालन प्रा. रश्मी डेकाटे यांनी तर स्वयंसेवक कु सुरोशे हिने आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close