स्व.बाबाराव लेवेकर पैलवान स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

पुसद : येथील स्व .बाबाराव लेवेकर पैलवान स्मृर्ती प्रतिष्ठानच्या वतीने ईटावा वार्ड सप्तशृंगी मंदिराच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम मान्यवराच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी स्व.बाबाराव लेवेकर पैलवान स्मृर्ती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद भाऊ मैन्द तसेच प्रमुख पाहुणे ॲड.भारत जाधव, किरण देशमुख, पंडित देशमुख, सौ शुभांगी पानपट्टे, शिवसेना तालुकाप्रमुख संजयजी बयास ,शिवसेना शहर प्रमुख दीपक उखळकर, तिरुपती डेव्हलपर्स अँड बिल्डर्स संचालक आनंद शिरामवर व राजेश पिवळटकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी आपल्या परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रगरागिनी महिलांचा शाल शिरफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी योग शिक्षिका सौ. विजयाताई चव्हाण योगा करिता सन्मानित करण्यात आल्या तसेच सौ.अरुणाताई जाधव यांना सामाजिक कार्यात योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सौ. उज्वलाताई खंदारे यांचा सुद्धा मान्यवरांच्या ते सत्कार करण्यात आला तसेच अंगणवाडी सेविका सौ. संगीताताई पवार छायाताई घोडेकर गोकर्णाताई बोंबले व संगीताताई मुजमुले यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सौ.अर्चनाताई राजेश शिंदे यांचा गॅझेटेड ऑफिसर व ईटावा वर्गातील प्रथम नोटरी म्हणून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जाधवसर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्व. बाबाराव लेवेकर पैलवान प्रतिष्ठानचे संचालक रमेश चव्हाण यांनी केले या कार्यक्रमाच्या वेळी उद्योगपती नारायण चव्हाण, श्री अनिल चव्हाण पाटील शिवसेना शहर संघटकअरविंद कांबळे, अमोल वानखेडे, गायमुख नगर ग्रामपंचायत सदस्य विनोद चव्हाण, गब्बर राठोड, विजय राठोड , दशरथ राठोड, शालिकराम पाटील सुशांत कदम श्रीकांत मोरे गजानन गडदे पिंटू चव्हाण संजय शिंदे ॲड.राजेंद्र शिंदे अखिलेश गावंडे जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्य तसेच पत्रकार बांधव आदी मान्यवर उपस्थित होते



