युवकांने केली आत्महत्या; वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद: वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीरामपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ जिल्हा परिषद कॉलनीमध्ये मळघणे यांच्या घरी भाड्याने असलेल्या युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजन घटना १७ जुलैच्या रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास उघड झाली आहे. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव करण बबन जाधव (१८) रा. साई (ई.) असे आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करण बबन जाधव हा बारावीचे शिक्षण घेत असल्यामुळे पुसद येथे खाजगी शिकवणी वर्ग लावला होता. घटनेच्या दिवशी मृतकांने खोलीच्या दरवाजा आतून बंद करून स्लॅपला असलेल्या लोखंडी गजाच्या हुकला नायलॉन दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. स्थानिक विद्यार्थ्यांनी जेवणासाठी आवाज दिला असता अतुन प्रतिसाद न आल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता मृतदेह लटकलेल्या अस्थेत दिसला त्यावेळेस त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली.आत्महत्या मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही तरीही वसंत नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठविला प्राथमिक माहितीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे सदर घटनेचा अधिक तपास वसंत नगर पोलीस करीत आहेत.