ईतर

उमरखेड ठाणेदारपदी शंकर पांचाळ रुजू!

उमरखेड:मागील एक आठवड्यापासून रिक्त असलेल्या उमरखेड पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी पुसद येथे अवघे काही दिवसांपूर्वी रुजू झालेले ठाणेदार शंकर पांचाळ हे दि.४ जुलै २०२३ ला उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून रुजू झाले मागील आठवड्यात जिल्हा पोलीस दलात बदल्यांची सत्र सुरू झाले होते येथील ठाणेदार अमोल माळवे यांची बदली पांढरकवडा येथे झाली असून तेव्हापासून ठाणेदार पद रिक्त होते पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले ठाणेदार शंकर पांचाळ यांना त्यांच्या विनंतीवरून उमरखेड येथे रुजू होण्यास सांगण्यात आल्याचे कळते रुजू होत होताच विविध सामाजिक संघटनेसह पत्रकार बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच पांचाळ यांनी उमरखेड शहराची माहिती घेऊन शांतता व सुव्यवस्था ठेवण्याविषयी माझे प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close