सेवादास नगर शेत शिवारातील खून प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी खंडाळ्याच्या जंगलातुन जेरबंद!

पुसद : तालुक्यातील खंडाळा घाटातील सेवादास नगर शेत शिवारातील ई क्लासच्या जमीनीवर फेट्रा येथील दिलीप महादू ढाकरे या इस्माचा पुसद-वाशिम राज्य मार्गावर अडवून लुटले आणि त्यांचा दगडाने ठेचून खून केला व त्याची मोटर सायकल घेऊन आरोपी पसार झाले होते त्या खून प्रकरणातील एका आरोपीला मोटर सायकलची विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने अटक करून गुन्हा उघडकीस आणला होता परंतु या खून प्रकरणातील मुख्य आरोपी खुनाच्या दिवसापासून फरार होता तो आरोपी नामे प्रकाश उर्फ पक्या उत्तम राठोड वय ३५ वर्ष रा. सेवादास नगर यास पकडण्यात वसंत नगर पोलिसांना मोठे यश आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे यांनी २९ एप्रिल रोजी खंडाळ्याच्या जंगलातून यास ताब्यात घेऊन जेरबंद करुन कायदेशीर कारवाई केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की,दि,२५ एप्रिल२०२६ रोजीचे पुर्वी पुसद तालुक्यातील खंडाळा घाटातील पुसत ते वाशिम राज्य मार्गालगत वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सेवादास नगर शेत शिवारातील ई क्लासच्या जमिनीवर अज्ञात ईसमाचा मृतदेह दगडाने ठेचून मारून खुन केल्याचे मिळुन आला होता नमुद गुन्हा स्थागुशा कॅम्प पुसद, यवतमाळ यांनी उघडकीस आणुन एका आरोपी अटक केला होती.त्यावेळीआरोपी शोध करीता जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंत यांनी तपास करीता बाहेर जिल्हा जाण्यासाठी परवानगी व सुचना तसेच आदेश दिले होते त्या आदेशावरून वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांनी तात्काळ सपोनि. सुगत पुंडगे यांना तपास करिता रवाना केले असता सदर गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी नामे प्रकाश उर्फ पक्या उत्तम राठोड, वय ३५ वर्षे, सेवादास नगर, पुसद याचे मागावर पो. स्टे. वसंतनगर चा स्टाफ हिंगोली, परभणी, वाशिम या जिल्ह्यात विशेष शोध मोहीम राबवित असताना दि. २९ एप्रिल२०२६ रोजी खंडाळ्याच्या जंगलात आरोपी लपून बसल्याचा सुगावा लागल्याने मोठ्या शितापीने वसंत नगर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्यास जेरबंद करून कायदेशिर कार्यवाही केली आहे.सदर ची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, सहा. पोलीस अधिक्षक हर्षवर्धन बि. जे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे, सपोनि सुगत पुंडगे, सफौ. अशोक चव्हाण, पोहवा सुरेश राठोड, पोहवा विजय ठाकुर, गोपाल ठाकुर, पोकॉ. प्रमोद पवार, सुनिल मोरे, चालक देवानंद गायकवाड यांनी पार पाडली असुन सदर गुन्ह्यांचा अधिकचा पुढील तपास सपोनि सुगत पुंडगे हे करीत आहेत.



