Uncategorizedईतर

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुसद शहरात काळ्या फिती लावून महाविकास आघाडीची निदर्शने

पुसद:बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. काल उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. मात्र, या बंदला मुंबई उच्च न्यायाण्याने बेकायदेशीर ठरवत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक मागे घेत मुलींवरील अत्‍याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मुक आंदोलने केली. त्‍या पार्श्वभूमीवर पुसद शहरात शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच काँग्रेसच्या वतीने काळ्या फिती लावून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहिम राज्यपालांना निवेदन देऊन राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध करण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच नराधमाने पाशवी अत्याचार केले ते,या मानव जातीला काळीमा फासणारे तर आहेच,परंतु या राज्यात कोणालाही कायद्‌याची जरब वाटत नाही हे दाखवून देणारे सुद्धा आहे.या घटनेची तीव्रता लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी आवाज उठविल्यानंतरच हे प्रकरण कायदेशीर मार्गाने हाताळण्यात येत असले तरीही त्यात अन्यायग्रस्तांना न्याय मिळेलच याची शाश्वती वाटत नसल्यामुळे दि.२४ ऑगस्ट रोजी या घटनेच्या निषेधार्थ,जयस्तंभ चौक लहसील कार्यालय समोर पुसद, सदर अमानुष कृत्य करणाऱ्या अपराध्याला तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी या निवेदना‌द्वारे करण्यात आली आहे. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा म्हणजेच केवळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. आणि या राज्यातील महिलांच्या सुरक्षेची काळजी सरकारने गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडी पुसद,तर्फे निवेदना‌द्वारे करीत आहोत. यापुढे अशा घटना राज्यात घडणार नाही याची हमी आता सरकारने द्यावी, अशीही मागणीही यावेळी उपस्थितांनी केली आहे या निवेदनावर खाली पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या स्वाक्षरी आहेत.काँग्रेसचे नेते डॉ मोहम्मद नदीम, शहर अध्यक्ष झिया शेख, अनिल शिंदे, ऍड.गजानन देशमुख, अब्दुल वाहब, जब्बार लाख, तहेसीन खान, विठ्ठल दुपारते, अब्दुल समद, पाशा खान, नागेश राऊत, सय्यद जाणी,सोहेल चव्हाण,मधुकर राठोड राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्षाचे शहर अध्यक्ष साकिब शाह, साहेबराव ठेंगे,नाना जळगावकर,सुरेश धनवे,संजय पाटील कन्हेकर,दीपक जाधव, दीपक अवचार, सिद्दीकी जोया, धनंजय सत्यपाल, फारूक अहेमद, माधव जाधव, नवाज अली,चावळा, प्रशांत नरवाडे, उद्धधव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते रंगराव काळे, तालुका प्रमुख रवी पांडे, राजू वाकडे, विकास जामकर,ऍड वीरेंद्र राजे,राजिक देशमुख, विजय बाबर,मालतीताई मिश्रा, ऍडव्हान्स विदजली पोहरकर ,सुशील कुमार करे, संजय भोणे, सय्यद गायसोद्दीन सह महाविकास आघाडीचे सर्व नेते व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close